Baramati News : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत बारामतीतील काऱ्हाटी ग्रामपंचायत राज्यात पहिली; एक कोटींचे पारितोषिक मिळणार

अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने 'भूजल समृद्ध ग्राम' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
Karhati Gram Panchayat in Baramati first in State in Groundwater Rich Village Competition
Karhati Gram Panchayat in Baramati first in State in Groundwater Rich Village Competitionsakal
Updated on

बारामती - भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये सन 2022-2023 या कालावधीसाठी राज्यातून प्रथम क्रमांकाचा एक कोटी रुपयांचा तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार बारामती तालुक्यातील का-हाटी ग्रामपंचायतीस जाहीर झाला आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कारांतर्गत काऱ्हाटी ग्रामपंचायतीला प्रथम, पुरंदर तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायतीला 30 लाख रुपयांचा द्वितीय आणि चांबळी ग्रामपंचायतीला 20 लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार झाला झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.