Karnataka Election : वारज्यात महाविकास आघाडीचा पेढे वाटून जल्लोष

हवेली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन रामचंद्र बराटे यांनी याचे आयोजन
karnataka election congress won celebration of Mahavikas Aghadi in Warje
karnataka election congress won celebration of Mahavikas Aghadi in Warjesakal
Updated on

खडकवासला : कर्नाटकात कॉंग्रेस पक्षाला मिळालेले बहुमत मिळाल्यानंतर खडकवासला मतदार संघातील वारजे माळवाडी येथे काँग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनता दल यांच्यावतीने एकत्रित येऊन फटाके वाजवत, पेढे वाटून विजयाचा जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

हवेली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन रामचंद्र बराटे यांनी याचे आयोजन केले होते. फटाक्यांची आतिषबाजी, काँग्रेससह महाविकास आघाडीतील पक्षांचा जयघोष, या निवडणुक प्रचारात बजरंग दलाचा मुद्दा उपस्थित झाला होता. म्हणून श्रीहनुमानाचा फ्लेक्स घेतला होता. हलगीच्या तालावर रंगलेल्या फुगड्या खेळत साखर पेढे वाटले.

यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य श्रीकृष्ण बराटे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर भोरकडे, दत्ता झंजे, माउली बराटे, चंद्रकांत बराटे, मारुती मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजकुमार शिंदे, अनिल गायकवाड, जनता दलाचे दत्ता पाखिरे, विनायक लांबे, आलम पठाण, पैगंबर शेख यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

कॉंग्रेसने १३८ जागा मिळवत मोठा विजय मिळवला आहे. प्रियांका व राहुल गांधी अहंकार न ठेवता काम केले. त्यामुळे कॉंग्रेस कर्नाटकात घराघरात पोचली आहे. रामभक्त हनुमान यांचा नावाचा वापर केला तरी कर्नाटकात भाजप साफ झाली अशीच आता लोकसभेला रामाच्या नावाने मत मागून देखील देशातून साफ होईल. असे हवेली तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन बराटे यांनी सांगितेले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसमध्ये पोकळी निर्माण होत गेली. दरम्यान, भाजपने सत्ता काबीज केली. परंतु कर्नाटकच्या या निकालाने राहुल व प्रियांका गांधी यांनी ती पोकळी भरून काढली असे दिसून आले. राज्यात असा निकाल अपेक्षित असेल तर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रित लढावे लागेल.

बराटे पाटलांची फुगडी रंगली

जल्लोष करताना दिलीप बराटे व सचिन बराटे, श्रीकृष्ण बराटे व बाबा धुमाळ, दत्ता झंजे व प्रभाकर भोरकडे यांच्या फुगड्या चांगल्या रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.