पुणे : दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव इथं 'शौर्य दिन' साजरा केला जातो. लाखोच्या संख्येनं इथल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनता इथं भेट देत असते. पण या शौर्य दिनाला आता करनी सेनेनं विरोध केला आहे. शासानानं या कार्यक्रमावर बंदी घालावी तसेच हा विजय स्तंभ बुलडोझर लावून पाडण्यात यावा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (Karni Sena opposes Bhima Koregaon Shaurya Din serious allegations made against Prakash Ambedkar)
करनी सेनेचे अजय सेंगर यांनी साम टिव्हीला आपली भूमिका मांडताना सांगितलं की, "इंग्रजांकडून लढलेल्या गद्दार भारतीयांचा शौर्यदिन या देशात साजरा कसा काय होतो. राज्याचे मुख्यमंत्री हे कसं काय सहन करतात. आम्ही करनीसेनेच्यावतीनं १ जानेवारी रोजी इंग्रजांविरोधात इथं जे भारतीय लढले त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभा घेणार आहोत. कारण गद्दार भारतीयांना अभिवादन करण्यासाठीचा कार्यक्रम कोरोगाव भीमा इथं होतो. या कार्यक्रमावरे बंदी टाकावी अशी मागणी आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे"
प्रकाश आंबेडकरांनी दंगली व्हाव्यात यासाठी कार्यक्रम सुरु केला - सेंगर
"देशामध्ये गद्दारांचा सन्मान होता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. या देशासाठी प्राणाचं बलिदान ज्यांनी दिलं आहे. त्यांचा हा एकप्रकारे अपमान आहे. हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. कोरोगाव भीमा येथील विजयस्तंभ उभारण्यात आला आहे हा सरकारनं बुलडोझर लावून पाडला पाहिजे.
हिंदू आणि बौद्ध हे भाई-भाई आहेत यांच्यातील संबंध बिघडवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. ही प्रथा चालू केली आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी. आपली राजकीय चूल पेटवण्याकरता त्यांनी हिंदू आणि बौद्धांमध्ये दंगली निर्माण व्हाव्यात हा त्यांचा हेतू आहे" असा आरोपही सेंगर यांनी यावेळी केला.
करनी सेनेला सचिन खरात यांचं उत्तर
करनी सेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना रिपाईचे नेते सचिन खरात म्हणाले, "करनी सेनेचे अजय सेंगर हे महाराष्ट्रात वेळोवेळी जातीवरुन आणि धर्मावरुन तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी करत असतात. त्यांनी या कार्यक्रमावर बंदी घालावी ही जी मागणी केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा.
भीमा कोरेगावची लढाई ही पेशवे आणि दलित समाजात झाली. कारण पेशव्यांनी त्यावेळी त्यांच्या गळ्यात मडकं आणि झाडू लावला होता. याचा निषेध म्हणून त्या काळात ही लढाई झाली. यामध्ये इंग्रजांकडून लढलेल्या दलित सैनिकांचा विजय झाला. महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की, अजय सेंगर यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक झाली पाहिजे. ही लढाई झालेली आहे चकमक नाही, त्यामुळेच इथं विजय स्तंभ उभारण्यात आला आहे, हे आधी समजून घ्या.
हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
काँग्रेसनंही दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, काँग्रेसनंही करनी सेनेच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. यावर सचिन सावंत म्हणाले, "भाजपच्या पाठिंब्यानं असे लोक अशा मागण्या करत राहतात. जो इतिहास आहे तो सत्य आहे. आमची अपेक्षा आहे की भाजपचे जे सरकार आहे त्याचं यावर काय म्हणणं आहे यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यावी आणि स्पष्टता आणावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.