Karuna Munde: 50 खोक्यांवर करुणा मुंडे यांचं मोठं विधान; म्हणाल्या माझ्या नवऱ्याने...

Dhananjay Munde
Dhananjay Mundeesakal
Updated on

पुणे - राज्यात आज जे राजकारण सुरू आहे ते खरच थक्क करणारं आहे. मुख्य मुद्दे सोडून आपली खुर्ची वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. जनतेची कुणीच मदत करत नाही. तीन पक्ष एकत्र आणि दुसरे तीन पक्ष एकत्र येवून राज्याचं वाटोळं करत असल्याची टीका करुण मुंडे यांनी केली.

Dhananjay Munde
Amit Shah: दहशतवादाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये'; गृहमंत्र्यांचं विधान

करुणा मुंडे म्हणाल्या की, सगळे मंत्री आपली खुर्ची वाचवायला लागले आहेत. आम्ही राज्यातल्या सगळ्या संघटना एकत्र करून येणाऱ्या सगळ्या निवडणुका एकत्र लढणार आहोत. आम्ही गरीब जनेसाठी लढू, आम्ही घराणेशाही आणि हुकूमशाहीच्या विरोधात लढा देणार आहोत. रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना, शिवशक्ती सेना, सी आर सामाजिक संघटना या तिन्ही संघटना पुण्यात एक नवीन आघाडी स्थापन करणार आहोत. या आघाडीसाठी ३० ते ४० संघटना यामध्ये सामील होणार असंही म्हणाले.

महिलांच्या विरोधात अत्याचार होत आहेत. महिलांना कामं करू देत नाहीत, नुसत्या निवडणुका लढवायला सांगत आहेत. मी जास्तीत जास्त महिलांना आघाडीमध्ये सामील करून घेणार आहे. खूप कमी महिला आहेत ज्या मोठ्या घरातून येतात पण एक कॉमन महिला राजकारणात येईल तेव्हा ती सत्यता मांडेल, असंही करुणा मुंडे यांना म्हणाले.

Dhananjay Munde
Bharat Jodo Yatra: शेगावात कन्हैया कुमार मोदी स्टाईल मध्ये कडाडले, "बघताय का सामील व्हा"

सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे या महिला नेत्या माझ्याविषयी किंवा केतकी चितळे बद्दल बोलत नाहीत. कारण घराणेशाही मध्ये येते आहे. मी १० लाख लोकांपर्यंत पोहचले, असंही करुणा मुंडे यांनी म्हटलं. राहुल गांधींच्या भारत जोडोवर करुणा मुंडे म्हणाल्या की, राहुल गांधी मुद्दे नसताना चालत आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि नुसते चालत चालले आहे. तुटलेला भारत मोदी यांनी ३५४ लोकसभेच्या जागा जिंकून जोडला आहे. तुटलेला भारत राहुल गांधी काय जोडणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केले.

Dhananjay Munde
Savarkar issue and MVA : सावरकरांच्या मुद्द्यावरुन 'मविआ'त फूट पडणार का? जयराम रमेश यांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडत आहेत. ते स्वतः रिक्षाचालक होते म्हणून ते सामान्य लोकांचे काम करत आहेत. मला त्यांचे कौतुक आहे. मात्र आगामी काळात मी एकनाथ शिंदे बरोबर जाणार नाही, असं करुणा मुंडे यांनी सांगितलं. मात्र जे मंत्री महिलांवर बोलतात त्यांना काढून टाकले पाहिजे. करुणा मुंडे ५० खोक्यांवर म्हणाले की, मी माझ्या डोळ्यांनी बघितले नाही पण मझ्या नवऱ्याने २०१९ मध्ये जे केलं, आमदार घेऊन जाऊन अजित पवारांना गृहमंत्री बनवलं ते कुणाला नाही दिसलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.