Kasaba Bypoll Election : आनंद दवेंच्या उमेदवारीचा भाजपला फटका बसणार? भाजपची भूमिका काय?

Kasaba Bypoll Election
Kasaba Bypoll Election
Updated on

Kasaba Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. काँग्रेस मधून बंडखोरी केलेले उमेदवार बाळासाहेब दाभेकर आणि आम आदमी पक्षाचे किरण कद्रे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी अर्ज मागे घेणार, अशा चर्चा होत्या. मात्र दवे यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याचा भाजला फटका बसणार असल्याची चर्चा आहे.  हिंदू मतांचे विभाजन झाले तर याचा थेट परिणाम भाजपच्या मतांवर होणार आहे.

दरम्यान यावर भाजपने भूमिका  स्पष्ट केली आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये आनंद दवे देखील आहेत. मात्र कसबा विधानसभा मतदार संघातील मतदार सुज्ञ आणि हुशार आहेत. ते आपलं मत वाया घालवणार नाहीत, असे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.

"कसब्यात भाजपची संघटना मजबूत आहे. भाजपचे उमेदवार देखील चांगले आहेत. गणेश मंडळ व सर्व लोकांचा त्यांना पाठींबा आहे. त्यामुळे भाजपचा विजय नक्की आहे. आनंद दवे उभे राहील्याने भाजपला कुठलाचं फरक पडत नाही. असे प्रयोग कसब्यात यापूर्वी फसले आहेत. आता देखील फसतील आणि हेमंत रासने विजयी होतील", असे जगदीश मुळीक म्हणाले. 

Kasaba Bypoll Election
Congress : स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातून आलोय, अपमान सहन करणार नाही; कारवाईनंतर रजनी पाटील आक्रमक

आनंद दवे काय म्हणाले -

आम्ही अर्ज मागे घेणार नाही आम्ही निवडणूक जिंकण्यावर ठाम असून अर्ज मागे घेण्याचा विचार कधीच केला नव्हता, असे प्रतिपादन आनंद दवे यांनी केले आहे. टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारली आणि त्यानंतर आमच्यासाठी अजून सोयीचे वातावरण झाले आहे. जुने वाडे, इमारती, आर्थिक आरक्षण आणि पून्येश्र्वर मुक्त आणि सुंदर कसबा कसा दिसेल यासाठी पोटनिवडणूक लढवणार, असे आनंद दवे म्हणाले.

Kasaba Bypoll Election
Eknath Khadse :...तर मुख्यमंत्रीपदासाठी गिरीश महाजन यांना पाठिंबा; कट्टर विरोधक खडसेंचं विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.