Kasba Peth Bypoll Election Result : 'या' गोष्टींचा फटका बसला; कसब्यातील भाजप उमेदवाराची पहिली प्रतिक्रिया

kasba bypoll Result BJP hemant rasane first reacion on ravindra dhangekar win kasaba Kasba Peth Bypoll Election
kasba bypoll Result BJP hemant rasane first reacion on ravindra dhangekar win kasaba Kasba Peth Bypoll Election Sakal
Updated on

Kasba Peth Bypoll Election Result : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकरांनी विजयी आघाडी घेतली. यानंतर भाजपचे पोटनिवडणूकीचे उमेदवार हेमंत रासने यांनी पोटनिवडणूकीत मिळालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. रासने यांनी या पोटनिवडणूकीत उमेदवार म्हणून मी स्वतः कमी पडलो असे म्हटले आहे.

भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या कसब्यात मतदारांनी भाजपला झटका दिला आहे. तब्बल ११०४० मतांनी महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. यादरम्यान निकालाबद्दल बोलताना रासने म्हणाले की, मला निकालाचं आत्मचिंतन करावं लागेल. मतं कुठं कशी पडली आणि मी कुठं कमी पडलो हे तपासावं लागेल असेही रासने म्हणाले. आकडे बुथ नुसार पाहील त्यानंतर कुठं कमी पडलो ते पाहू असेही त्यांनी सांगितले.

kasba bypoll Result BJP hemant rasane first reacion on ravindra dhangekar win kasaba Kasba Peth Bypoll Election
Kasba Bypoll Result: बालेकिल्ल्यात भाजपचा लाजिरवाणा पराभव! धंगेकरांचा दणदणीत विजय

पाच टर्म जे मतदार मुक्त टिळक आणि बापट यांच्या पाठीशी उभे होते ते तुमच्या पाठिशी का उभे राहिले नाहीत असा प्रश्न विचारला असता रासने म्हणाले की, मी त्या मतांची अकडेवारी बघेल त्यानंतर माझ्या लक्षात येईल. मी स्वतः उमेदवार म्हणून कमी पडलो, इतर फक्टर बद्दल मला बोलायचं नाही असे रासने यांनी स्पष्ट केलं. पक्षाने मला उमेदवारी देत माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी हरलो त्यामुळे पात्र ठरलो नाही. निवडणूकीत अनेक फॅक्टर असतात पण जबाबदारी माझीच असते असे रासने म्हणाले. हा निकाल मी विनम्रपणे स्विकारतो असे रासने म्हणाले.

२००९ पासून मतदार संघाची रचना झाली तेव्हा हा एक लाखाचा कसबा तिन लाखांचा झाला. पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली, दोन विचारांचा पगडा असलेला मतदार विभागला गेला.या आधिच्या निवडणूका तिरंगी, सहारंगी झाल्या पण ही निवडणूक वन टू वन झाली याचा परिणाम झाला असेल असेही रासने म्हणाले.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा

kasba bypoll Result BJP hemant rasane first reacion on ravindra dhangekar win kasaba Kasba Peth Bypoll Election
Kasba ByPoll Result: धंगेकरांच्या विजयामागची 'पाच' कारणं; शिंदे-फडणवीसांनी तळ ठोकूनही फायदा नाही

पुढे बोलताना रासने म्हणाले की, पहिल्यांदा पैसे वाटल्याचा आरोप झाला नंतर नेते आणल्याचा आणि ईव्हीएम मशीनवर आरोप झाला. आता ईव्हीएम मशीनवर आरोप करणार का तुम्ही? कालपर्यंत तर करत होते. हे आरोप केले त्याचा थोडाफार फटका मला बसला असेल. असेही रासने यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.