Kasba Chichwad Bypoll Election : येत्या २६ फेब्रुवारी रोजी कसब्यासह चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
यासाठी भाजपसह मविआनं विजयासाठी कंबर कसली असून, कालचं कसब्यातील हुकमी एक्का म्हणून परिचित असलेल्या गिरीश बापटांनी मेळावा घेत कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कसब्याच्या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी उतरणार आहेत.
कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांचा मेळावा येत्या २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत होणार आहे. या दोन्ही ठिकाणी पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, बापटांना कसब्याचे किंगमेकर मानले जाते, तर, शरद पवारांना निवडणुकीतील गेमचेंजर मानले जाते. त्यामुळे पवारांच्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी याच दिवशी सकाळी ११ वाजता शरद पवार मेळावा घेणार आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी मविआने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
तर, भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली असून, आज धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
बापट काय म्हणाले?
कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र यावेळी कसब्यामध्ये चुरस आहे. सध्याची परिस्थिती पाहता, भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले आहे.
गिरीश बापट यांनी अनेक वर्षे या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा शब्द कसब्यात महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय भाजपने ब्राह्मणेत्तर उमेदावर दिल्याने मतदार वेगळा निर्णय घेतील, याची शक्यता होता. त्यामुळे आज हेमंत रासनेचा प्रचार करण्यासाठी खुद्द बापट समोर आले आहे.
बापट म्हणाले, १९६८ नंतर प्रथमच मी या निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकू अनेक वेळा हरलो, पण पक्ष संघटन कायम राहिले. ही निवडणूक चुरशची नाही, ही निवडणूक आपण चांगल्या मताने जिंकणार आहोत.
कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे. मी गेले अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धान्य मानलं, असं बापट यांनी म्हटलं.
आपला उमेदवार नक्की जिंकून येणार आहे. हेमंतचे काम चांगले आहे, थोडं नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. थोडी ताकद लावा मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल, असं आवाहनही बापट यांनी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.