Kataj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता खड्ड्यात! वाहनचालकांची होतेय कसरत

कात्रज-कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Katraj Kondhwa Road
Katraj Kondhwa Roadsakal
Updated on

कात्रज - कात्रज-कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह लहान मोठ्या अपघातांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

गोकुळनगर, स्वामी समर्थनगर, शिवशंभोनगर, माऊलीनगर या भागातून पावसाचे पाणी कात्रज-कोंढवा रस्त्यावर येते. त्यामुळे रस्ता जलमय होऊन खड्डे पडत आहेत. अशात इस्कॉन मंदिर चौक, माऊलीनगर चौक, शिवशंभूनगर गल्ल्यांच्या समोरील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.

शिवशंभोनगर गल्ली क्रमांक तीन व चार, गोकुळनगर चौक, प्रतीकनगर समोर मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरावे, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांतून होत आहे. पालिकेकडून खड्डे भरण्याचे काम सुरु करण्यात आले असले तरी ऐन पावसात खड्डे भरण्यात येत असल्याने त्याचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट असून पुन्हा परिस्थिती जैसे थे' होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून पावसाच्या आधी काळजी का घेण्यात येत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुलेट्स

  • पालिकेकडे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूंसपादनासाठी २१३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

  • भूसंपादन करुन रस्त्याच्या रखडलेल्या कामाला गती देण्याची नागरिकांची मागणी

  • सातत्याने डांबरीकरण करून खड्ड्यांचा सामना करण्यापेक्षा थेट काँक्रीटीकरण करुन रस्त्याचे मजबूतीकरण करण्याची अपेक्षा

  • अवजड वाहतूक मोठी असल्याने मोठ्या खड्ड्याचे प्रमाण जास्त

  • खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असून अंदाज न आल्याने दुचाकीचालकांचे अपघात होण्याच्या घटना

प्रतिक्रिया

श्रीराम चौकातील खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने काही ठिकाणी वाहतूक कमी करुन काम सुरु आहे. पुढील सात दिवसांत सर्व मोठे खड्डे बुजिवण्याचा आमचा निर्धार आहे. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. तसेच, भूसंपादनाच्या कामालाही आता गती मिळणार आहे.

- धनंजय गायकवाड, उपअभियंता पथ

राज्य सरकारने दिलेले पैसे आणि पालिकेने मंजूरी दिलेला निधी आता उपलब्ध आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती देऊन कायस्वरुपी यातून तोडगा काढावा.

- दत्तात्रेय बारवकर, स्थानिक नागरिक

कात्रज-कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहे. इस्कॉन मंदिर चौकातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा.

- विकास बधे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.