Katewadi Gram Panchayat: नाव मोठं लक्षण खोटं, अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपचा आरोप काय?

Katewadi Gram Panchayat
Katewadi Gram Panchayat
Updated on

Katewadi Gram Panchayat: आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्हयातील २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अशी लढत होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काटेवाडी अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. राज्याच्या राजकारणत एकत्र असणारे दोन्ही आमने-सामने आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी अजित पवार गटावर पैशे वाटल्याचा आरोप केला आहे. ही निवडणूक गावकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. गावातील भ्रष्टाचार आणि दहशत आपल्याला कमी करायची आहे. गावात काहीच व्यवस्था नाहीत. नाव मोठं आणि लक्षण खोटं, अशी परिस्थीती गावात आहे, असे कचरे म्हणाले.

Katewadi Gram Panchayat
मध्यप्रदेशात भाजप अन् काँग्रेसच्या आशा महिला मतदारांवर अवलंबून! काय आहे रणनीती?

रात्री आमचं गाव विकायला काढलं होतं की काय, काय माहिती? २५० रुपयाला आमचं गाव विकायला काढलं होतं. आमचं गाव विकणे आहे. एका माणसाची किंमत २५० रुपये आहे, असे बोर्ड आम्ही उद्या गावात लावणार आहे. ही खेदाची गोष्ट आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या गावात विकास केला असेल तर पैशे वाटायची गरज का पडली?, असा प्रश्न पांडुरंग कचरे यांनी उपस्थित केला.

यावर अजित पवार गटाचे माजी सरपंच विद्याधर काटे म्हणाले, संपूर्ण गाव हागणदारी मुक्त आहे. कुणी काय आरोप करायचे त्यांना काही बंधन घालता येत नाही. त्यांनी दखील पैसे वाटल्याचा आरोप मी करु शकतो. त्यांनी ५०० रुपये वाटले. मात्र पुरावा गरजेचा असतो. आरोप कुणीही करु शकते.  अजितदादा आणि वहिणीसाहेंबांनी गावाचा विकास केला आहे. 

Katewadi Gram Panchayat
Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानी धमकी प्रकरणात आणखी एकाला अटक; तेलंगणानंतर गुजरातमध्ये कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.