Vijay Shivtare : पवारांनी जे पन्नास वर्षात केले नाही ते पाच वर्षात मार्गी लागेल

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी (ता. १३) बारामती दौऱ्यानिमित्त श्रीक्षेत्र कन्हेरी येथे भेट दिली.
Vijay Shivtare
Vijay Shivtaresakal
Updated on

काटेवाडी - मागिल पन्नास वर्षात पवार साहेब व अजित पवार यांनी जे केले नाही ते पुढच्या पाच वर्षात मार्गी लागेल, अशा शब्दात टीका करत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवारांच्याच पावलावर पाऊल टाकत श्रीक्षेत्र कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ फोडून बारामती लोकसभा मतदार संघामधून आपली अपक्ष उमेदवारी जाहीर करत आपल्या प्रचाराची सुरुवात केली.

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी (ता. १३) बारामती दौऱ्यानिमित्त श्रीक्षेत्र कन्हेरी येथे भेट दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पवार कुटुंबीयांकडून बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मंदिरात नारळ फोडून केली जाते. याच मंदिरात अपक्ष उमेदवार म्हणून विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली.

या पार्श्वभूमीवर त्यांनी या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली असल्याचे सांगितले. शिवतारे पुढे म्हणाले की, बारामतीकडे चार वेळा मुख्यमंत्रीपद व पाच वेळा उपमुख्यमंत्री होते मात्र तरीही या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आम्ही किती दिवस यांना मते देत राहायचे. त्यामुळे जनतेने आता विचार करायला हवा. एक पर्याय म्हणून मी येथे उभा राहतोय.

पवारांनी एवढ्या वर्षात साडेचार लाख नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. मात्र एसटी स्टँड उभारण्यासाठी ६० कोटी रुपये खर्च केले जातात. असाच अनन्वित अन्याय बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर, खडकवासला, पुरंदर, भोर, दौंड तालुक्यावर झाला आहे. मला जर लोकांनी संधी दिली तर बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत.

शिवतारे यांनी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. घटक पक्ष म्हणून एनडीएचा घटक पक्ष म्हणून फोडला की, अपक्ष उमेदवार म्हणून असा प्रश्न केला असता शिवतारे म्हणाले की, सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी आज प्रचाराचा नारळ फोडला. उद्याचे काही सांगता येत नाही. कदाचित मी एनडीएचाही उमेदवार असू शकेल. ही जनतेची लढाई आहे. मी लढणार. मी माझ्या व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना समजवण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.

तुमचे जे इप्सित आहे ते अजित पवार एकटे लढून होणार नाहीत. इप्सित साध्य करायचे असेल तर मी उपयोगी पडेल. नरेंद्र मोदी विचार मंच किंवा नमो विचार मंचाच्या नावाने प्रचार करणार आहे. मी महायुतीच्या किंवा भाजपच्या विरोधात नाही. असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.