कात्रज : कात्रजमधील रेल्वे म्युझियम येथील बायोगॅस प्रकल्प मागील महिनाभरापासून केवळ विद्युत पुरवठा होत नसल्याने बंद आहे. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील कात्रज रेल्वे म्युझियम येथे प्रतिदिन ५ टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. सध्या या प्रकल्पावर कचरा येत नाही. दक्षिण पुणे परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना अशा क्षुल्लक कारणांसाठी महिनाभरापासून प्रकल्प बंद ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या प्रकल्पात ५ टन ओला कचरा जिरवून त्यामार्फत बायोगॅस तयार केला जातो. वॉर्डातील कचरा वॉर्डातच जिरवला जावा या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र त्यानंतर सातत्याने कचरा प्रकल्पावर कचरा जिरविण्यास अडचणी येत राहिल्या आहेत. त्यानंतर आता महापालिकेच्या डीपीपर्यंत केबल खराब झाली असून मीटर जळाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ३फेज विद्युतपुरवठा होत नाही, म्हणून प्रकल्प बंद आहे.
बायोगॅस प्रकल्पाचे कार्यादेश खासगी ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. ठेकेदाराकडून प्रकल्पावर ३ फेज विद्युतपुरवठामध्ये समस्या येत असल्याचे आणि मीटर जळाला असल्याची तक्रार महावितरणकडे केली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून महावितरणला पत्रही देण्यात आले आहे. परंतु, केवळ महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळित करण्यात दिरंगाई होत असल्याने प्रकल्प बंद आहे.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
''प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे प्रकल्प बंद असतो. याबाबत चौकशी केली असता सातत्याने दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात येतात. याबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणार आहोत."
- प्रतिक कदम, अध्यक्ष प्रगती फाऊंडेशन
''बायोगॅस प्रकल्पावरील मीटर जळाला होता. आता मीटर बदली करण्यात येणार आहे. बायोगॅस प्रकल्पावरील विद्युत पुरवठा लवकरच सुरळित होईल.''
- एस. एस. भोरे, शाखा अभियंता, कात्रज विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.