Katraj Dairy: कात्रज डेअरीकडून खुशखबर! दुधाच्या दरात शेतकऱ्यांना दोन रुपयांचा फरक मिळणार

pune milk rate : आर्थिक वर्ष २०२३-२४ चे व्यापारीपत्रक, नफातोटा पत्रक, नफा वाटणी, वार्षिक अहवाल, लेखापरिक्षण अहवाल, अंदाज पत्रक यावेळी सादर करण्यात आले. नवीन दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाकरिता आधुनिक मशिनरीसह प्रकल्प उभारणी व नविन प्रशासकीय इमारत बांधणेबाबत, दूध पुरवठा बंद असलेल्या संस्थांचे सभासदत्व रद्द करणेबाबत, लेखापरिक्षकांची नेमणूक करणे आदी निर्णय सभेत घेण्यात आले.
Katraj Dairy: कात्रज डेअरीकडून खुशखबर! दुधाच्या दरात शेतकऱ्यांना दोन रुपयांचा फरक मिळणार
Updated on

Pune News : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन रुपये दूध दर फरक देण्याचा निर्णय घेतला आहे. संघाची ६५वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२७) पार पडली. या आर्थिक वर्षात संघाला ३ कोटी १ लाख ५७ हजार निव्वळ नफा झाला आहे, मागील वर्षी संघाची तरतूद नसताना दूध फरकापोटी १ रुपया दूध दर फरक अदा करण्यात आला होता.

त्यानुसार संघाने सन २०२३-२४ मधील घातलेल्या दुधावर १ रुपया प्रति लिटर दूधदर फरक अदा करण्याची तरतूद केली होती. मात्र, संस्था प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून असमाधान व्यक्त करत तीन रुपये दूधदर फरक देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या मान्यतेने दोन रुपये फरक देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या दूधदर फरकापोटी संघाला १३ ते १४ कोटी रूपये अदा करावे लागणार आहेत.

आर्थिक वर्ष २०२३-२४ चे व्यापारीपत्रक, नफातोटा पत्रक, नफा वाटणी, वार्षिक अहवाल, लेखापरिक्षण अहवाल, अंदाज पत्रक यावेळी सादर करण्यात आले. नवीन दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाकरिता आधुनिक मशिनरीसह प्रकल्प उभारणी व नविन प्रशासकीय इमारत बांधणेबाबत, दूध पुरवठा बंद असलेल्या संस्थांचे सभासदत्व रद्द करणेबाबत, लेखापरिक्षकांची नेमणूक करणे आदी निर्णय सभेत घेण्यात आले.

Katraj Dairy: कात्रज डेअरीकडून खुशखबर! दुधाच्या दरात शेतकऱ्यांना दोन रुपयांचा फरक मिळणार
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगी गड घाट रस्ता मलबा हटविण्यासाठी सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत राहाणार बंद!

दूध उत्पादक सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष व संचालक मंडळाने उत्तर दिल्यानंतर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेमध्ये उत्कृष्टपणे कामकाज करणाऱ्या १६ आदर्श दूध संस्थांची निवड करण्यात आली. त्यांना प्रशस्तिपत्रक, सन्मान चिन्ह व स्वच्छ दूध उत्पादनास प्रोत्साहन तसेच पशुखाद्याची सर्वात जास्त विक्रीकरणाऱ्या ११ दूध संस्थांची निवड करण्यात आली होती.

त्यांना पुरस्कार, स्मृतीचिन्ह व पशुखाद्य विक्री वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ११ हजार रुपये देवून गौरविण्यात आले. सभेस आजी माजी संचालक तसेच, मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. सभेचे सुरुवातीस व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी स्वागत केले. तर संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी आभार मानले.

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची यशस्वी वाटचाल सुरू असून संघ सातत्याने दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. उत्पादकांना जास्तीत जास्त दूध खरेदी दर देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही संघास सहकार्य कारणे गरजेचे आहे.

-भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.