गडकरींचा शब्द कात्रजकरांसाठी ठरतोय थाप!

नागरिक कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकर चालू होऊन पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत
गडकरींचा शब्द कात्रजकरांसाठी ठरतोय थाप!
Updated on

कात्रज : साडेचार महिन्यांपूर्वी म्हणजेच १३ फेब्रुवारीला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी कात्रज उड्डाणपूलाच्या कामाला दोन महिन्यांत प्रारंभ होणार असा दिलेला शब्द हा कात्रजकरांसाठी थाप ठरत आहे. गडकरी यांनी १३ फेब्रुवारीला पुणे शहरातील महामार्गांच्या कामाच्या आढावा दौऱ्यात कात्रजच्या उड्डाणपुलाच्या कामाला दोन महिन्यात प्रारंभ होईल अशी माहिती दिली होती. परंतु, प्रत्यक्षात साडेचार महिने झाले तरी कामाला कुठल्याही प्रकारची सुरवात झालेली नाही.

नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडरसिटी येथून उड्डाणपूलावरून राजस सोसायटीच्या पुढे जाणार आहे. परिणामी कात्रज चौकातील व राजस चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढल्या असून हा पूल राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून जात आहे. या कामासाठी केंद्र सरकारकडून एकूण १६९.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा पूल सहापदरी असून त्याची लांबी एक हजार ३२६मीटर आहे.

गडकरींचा शब्द कात्रजकरांसाठी ठरतोय थाप!
आषाढी वारीसाठी देहूत तयारी

सबंधित काम पूर्ण होण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पंरतु, काम चालू होण्यासाठीच एवढा उशीर होत असेल तर ते काम पूर्ण कधी होणार? वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीपासून आपली कधी सुटका होईल? असे प्रश्न नागरिकांना आहेत.

गडकरींचा शब्द कात्रजकरांसाठी ठरतोय थाप!
पुणे शहरातील रिंगरोड प्रकल्प सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्ण होइल

''उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी झाली असून सर्वेक्षणही झाले आहे. कंत्राटदाराची निविदा अंतिम झालेली आहे. वर्क ऑर्डर देण्याचे काम प्रगतीत असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.''

- श्रुती नाईक, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.

''कात्रजकरांना कायम दुय्यम भूमिका देण्याचे काम करण्यात आलेले आहे. ज्या गतीने चांदणी चौकातील काम सुरु आहे त्या गतीने भविष्यात कात्रज चौकातील पूलाचे काम सुरु होऊन पूर्ण होईल आणि कात्रजकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल ही अपेक्षा आहे.''

- अमृता बाबर, स्थानिक नगरसेविका.

''उड्डाणपूलाचे काम लवकर पूर्ण झाल्यास कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. पंरतु, प्रत्यक्ष काम सुरु होण्यास सहा महिन्याचा कालावधी लागणार असेल तर दीड वर्षात काम पूर्ण कसे होईल हा प्रश्न आहे.''

- सोमनाथ चव्हाण, स्थानिक नागरिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.