Katraj Ghat : कात्रज घाट निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ!

विपुल वनसंपदेच्या हिरवाईने नटलेला डोंगर, डांबरी रस्त्याचा घाटमार्ग, गवताचा पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, सांडवे भरून वाहणारा पाझर तलाव, उंचावरून पाणी पडताना दिसणारा धबधबा आणि पक्ष्यांचा किलबिलाट असे हे मनमोहक सौंदर्य सध्या कात्रज घाट परिसरात पहायला मिळत आहे.
Katraj Ghat
Katraj Ghatsakal
Updated on

कात्रज : विपुल वनसंपदेच्या हिरवाईने नटलेला डोंगर, डांबरी रस्त्याचा घाटमार्ग, गवताचा पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, सांडवे भरून वाहणारा पाझर तलाव, उंचावरून पाणी पडताना दिसणारा धबधबा आणि पक्ष्यांचा किलबिलाट असे हे मनमोहक सौंदर्य सध्या कात्रज घाट परिसरात पहायला मिळत आहे. त्यामुळे दक्षिण पुण्यातील नागरिक व पर्यटकांची पाऊले कात्रज घाटाच्या निसर्ग सौंदर्याकडे वळताना दिसत आहेत. अनेकजण प्रवासास निघालेले असताना रस्त्याच्या कडेला उभे राहून या निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना दिसतात. तर काहीजण आवर्जून कात्रज घाटात जात असल्याचे दिसते.

शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर कात्रज डोंगररांगा, भिलारेवाडी वन विभागाच्या ९०० हेक्टर क्षेत्रावर विपुल वनसंपदा आहे. ऐतिहासिक कात्रज जुना बोगदा, आंबील ढग माथा, डोंगर उतारावरून वाहणारे झरे, गुजर-निंबाळकरवाडी व भिलारेवाडी पाझरतलाव पूर्ण क्षमतेने भरले असून विलोभनीय दृश्य घाटातून दिसते. तसेच, घाट रस्त्यालगत एका ठिकाणी उंच धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

सकाळच्या वेळी धुक्यामुळे हे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते. त्यातच मोरांच्या ओरडण्याचा आवाज लक्ष वेधून घेतो. कात्रज जुन्या बोगद्याशेजारी असलेली माकडे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात वर्षा सफर हा सर्वांच्याच आवडीचा विषय असल्याने शहरातील नागरिक कात्रज घाट परिसरात पर्यटनाला पसंती देताना दिसत आहेत. कात्रज घाट व भिलारेवाडी वन क्षेत्रात बिबट्या सारख्या वन्यजीवांचा अधिवास आहे. तसेच, घाट रस्ता वर्दळीचा असल्याने परिसरात फिरायला जात असताना नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.

वन विभागाचे दुर्लक्ष

अनेक ठिकाणी पर्यटक धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या कडेला वाहने उभी करुन उभा राहत अस्लयाचे दिसून येते. अशा ठिकाणी दिशादर्शक आणि सूचनांचे फलक तसेच रस्त्याच्या कडेला धोकादायक ठिकाणी बॅरिगेटिंग करणे गरजेचे आहे. मात्र, वननिभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

अनेकवेळा आपण पर्यटनासाठी दूरवर फिरत असतो. परंतु कधीकधी आपल्या आजूबाजूलाही हाकेच्या अंतरावर अशा प्रकारे सुखद अनुभव देणारी ठिकाणे असतात. त्यांचा आनंद घ्यायला हवा. कात्रज घाटातील सध्याची दृश्ये विलोभनीय अशीआहेत. - प्रतीक कदम, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.