Pune News: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात वाढले; उद्घाटनापासून 23 मृत्यू

कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आणि त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
road water
road wateresakal
Updated on

katraj kondhwa road accident

कात्रज, ता. १७ : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आणि त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघाती मृत्यूचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे भूमीपूजन झाले. तेव्हापासून कात्रजचौक ते खडीमशीनचौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ५५ अपघात झाल्याची नोंद भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ अपघातांची नोंद नाही.

कात्रज चौक ते गोकुळनगर चौकापर्यंत भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनची हद्द येत आहे. तर, गोकुळनगर चौक ते खडीमशीन चौकांपर्यंत कोंढवा पोलिसांची हद्द येत आहे. दोन्ही पोलिस स्टेशनला नोंद झालेल्या अपघातांमध्ये चार वर्षाच्या काळात २३ मृत्यूंची तर ३८ गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. वाढती अपघातांची संख्या त्यातून होणारे मृत्यू आणि अंपगत्वामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सद्यस्थितीत रस्त्यावरून एका तासाला साधारणतः ७ ते ८ हजार वाहनांची वाहतूक होते. यामध्ये अवजड वाहनाचे प्रमाण लक्षणीय आहे. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून येते.

road water
Nuh Violence: नूह हिंसाचारात पाकिस्तानी कनेक्शन?; पोलिसांकडून तपास, 200 जणांना अटक

कंटेनरखाली चिरडून एकाचा मृत्यू

कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या कंटेनर व स्पोर्ट बाईकमध्ये झालेल्या अपघातात शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एकाचा मृत्यू झाला. परामाउंट-इरोस सोसायटीसमोर गाडी स्लिप झाल्यानंतर कंटेनरच्या मागच्या चाकाखाली येऊन युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर घटनास्थळी धाव घेत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पुढील कार्यवाही केली.

वर्ष-एकूण-अपघात-मृत्यू-जखमी

२०१८-११-०५-०६

२०१९-१५-०४-१३

२०२०-०३-०१-०२

२०२१-१३-०५-१०

२०२२-०८-०३-०५

२०२३-०५-०५-०३

road water
Amit Shah in Pune: 'दादा, बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात'; अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव कात्रज-कोंढवा रस्त्याच्या बाबतीत दिसून येतो. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. आता महापालिकेकडून किमान ५० मीटरचा रस्ता मार्चपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. मागील अनेक दिवसांपासून या भागातील नागरिक म्हणून मी हे ऐकत आलो आहे. प्रशासनाने हा रस्ता केल्यास ते बक्षिसपात्र असतील. मात्र, त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर करावा हीच आमची मागणी आहे. - प्रतिक कदम, स्थानिक नागरिक

युद्धपातळीवर या रस्त्यासंदर्भात काम सुरु आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागील आठवड्यात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा करुन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पुढील आठवड्यातही मुख्य आयुक्तांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

road water
Puneet Superstar: बिग बॉस मधुन हाकललं, आता पुनित सुपरस्टार दिसणार या प्रसिद्ध रिअॅलिटी शो मध्ये

महत्वाच्या नोंदी

- २१८मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन

- भूसंपादनाअभावी रखडले रस्त्याचे काम

- भूसंपादनासाठी राज्यसरकारकडून २०० कोटींचा निधी मंजूर

- तुकड्या तुकड्यात काम झाल्याने नागरिकांना फायदा नाही

- इस्कॉनमंदिर चौकातील भुयारी मार्गाच्या कामाला गती

- महापालिकेकडून ८४ ऐवजी ५० मीटरचा रस्ता मार्च २०२४ अखेरीस पूर्ण करण्याचा वादा

- ५० मीटर रुंदीकरणाच्या हिशोबाने अनेक महत्वाच्या जागा ताब्यात घेण्यात आल्याची प्रशासनाकडून माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.