पुणे - कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी राज्य सरकारकडून निधी आलेला असला तरी भूसंपादन धिम्या गतीने सुरु आहे. आज महापालिकेने भूषण सोसायटी येथील ८३५ चौरस मीटरची जागा ताब्यात घेतली. यामुळे विस्तारित उड्डाणपूल उतरणार आहे तेथे सेवा रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.