कात्रज : भूमिपूजनाच्या वादातून दोन नगरसेवकांची भर रस्त्यात हमरीतुमरी
पुणे : कात्रजमधील प्रभाग क्र. ३८मध्ये उत्कर्ष सोसायटीतील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद जुंपला. या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वादविवाद सुरू झाला. उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम व भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे.
कात्रजतलाव प्रवेशद्वार ते शेलारमळा, गुजरवस्ती, महादेवनगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने मोठी वाहतूक असते. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ता विकसनाची मागणी जोर धरत होती. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नागरिकांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये विकासकामे करण्याच्या स्पर्धा सुरू आहेत.
त्यावरून अनेक ठिकाणी श्रेयवाद लढाई पाहायला मिळते. यातीलच हा प्रकार असल्याचे दिसून येते. याबत याठिकाणी उपस्थित असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांनी माहिती देणे टाळले.
दोन्ही सभासदांनी या रस्त्याला वेगवेगळ्या माध्यमातून निधी मिळवला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून निधी असल्याने भूमिपूजनावरून विसंवाद झाल्याने गोंधळ झाला. तरी आता दोन्ही सभासदांनी कामाची विभाजनी करून काम करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे.
- संदीप कदम, उपायुक्त, परिमंडळ ४
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.