Water Crisis : ऐन सणासुदीत पाण्यासाठी तारांबळ; राजीव गांधी प्राणी संग्रहालय पंपिग स्टेशनवरुन पाणीपुरवठा खंडित

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळील पंपिग स्टेशनवरुन पाणीपुरवठा खंडित झाल्याने ऐन सणासुदीत पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
katraj water crisis pump technical issue water supply navratri festival
katraj water crisis pump technical issue water supply navratri festivalSakal
Updated on

कात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळील पंपिग स्टेशनवरुन पाणीपुरवठा खंडित झाल्याने ऐन सणासुदीत पाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. केदारेश्वर टाकीला जाणाऱ्या पंप क्रमांक तीनची बेअरिंग खराब झाल्याने पंप बंद झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठा झाला नाही. शनिवारी दुपारी हा बिघाड झाल्यानंतर रविवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही.

केदारेश्वर टाकीवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या सुखसगारनगर भाग १, भाग २ राजस सोयायटी परिसर, साईनगर आदीसह सुखदा वरदा संकुल, चैत्रांगण, सुखनिवास आदी सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले.

घटस्थापनेचा पहिलाच दिवस आणि पाणी नसल्याने महिलांची चिडचिड झाली. या घटनेने नागरिकांच्या मनात पाणीप्रश्नांवरून प्रशासनाच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली असून मागील काही दिवसांपासून पाणीचोरी, पाणीगळती होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असताना ऐन सणाच्या दिवशी पाणीपुरवठाच झाला नसल्याच्या तक्रारीने नागरिक हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी पाणी विकत घेत तात्पुरती व्यवस्था केली.

katraj water crisis pump technical issue water supply navratri festival
Pune News : विद्यार्थी वाहतूक वाहनांना मिळावेत परवाने; वाहनचालक आणि व्यावसायिकांची अपेक्षा

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाजवळील पंपिग स्टेशनवरील केदारेश्वर झोनसाठी असणाऱ्या पंप क्रमांक तीनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे तो पंप बंद झाला. दुसरा पंप पहाटे चार वाजता चालू करण्यात आला. त्यानंतर आता पाणीपुरवठा सुरळीत होईल.

- जालिंदरसिंह राजपूत, शाखा अभियंता, विद्युत विभाग

पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाल्याने शनिवारी दुपारपासून ही परिस्थिती ओढवली आहे. आता विद्युत विभागाकडून पंपाचे काम करण्यात आले असून टाक्या भरल्या की पाणीपुरवठा सुरळित होईल. त्यासाठी सोमवारी दुपारपर्यंत वेळ जाईल असा अंदाज आहे.

- संदीप मिसाळ, शाखा अभियंता पाणीपुरवठा

अपुरा पाणीपुरवठा होत असताना आज ऐन सणासुदीच्या दिवशी पाणीपुरवठा झाला नाही. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता पंपिंग बंद असल्याचे सांगण्यात येते. आम्हाला सामान्य माणसांना यातील काही कळत नाही. पण, ऐन सणासुदीच्या दिवशी पाणी न आल्याने प्रचंड चिडचिड झाली. अखेर टँकरने पाणी आल्यावर प्रश्न मिटला.

- श्रद्धा कुलकर्णी, स्थानिक महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.