Pune Crime: चपलेच्या स्टँडमध्ये घराची चावी ठेवणे पडले महागात; धायरीतील कुटुंबाला अडीच लाखांचा फटका

Pune Thief News: मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालकाने चपलेच्या स्टँडमध्ये घराची चावी ठेवली होती. चोराला चावी ठेवल्याचा सुगावा लागला आणि त्याने थेट भर दुपारी डल्ला मारला.
shoe stand
shoe stand
Updated on

Pune Crime: चपलेच्या स्टँडमध्ये घराची चावी ठेवणे एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे पुण्यातील रिक्षा चालकाला अडीच लाखांचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालकाने चपलेच्या स्टँडमध्ये घराची चावी ठेवली होती. चोराला चावी ठेवल्याचा सुगावा लागला आणि त्याने थेट भर दुपारी डल्ला मारला.

पुण्यातील रिक्षाचालक असलेल्या बाबुराव शिंदे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. धायरी परिसातील निसर्ग हाईट्समध्ये शिंदे यांचं कुटुंब राहतं…तिघे सकाळी ८ वाजता घर सोडतात आणि मुलगा ११ वाजता घराला कुलूप लावून शाळेत जातो. मागील दीड ते दोन वर्ष हा शिंदे कुटुंबाचा दिनक्रम होता. मात्र २५ सप्टेंबरला मुलाने रोजसारखं कुलूप लावलं आणि शाळेत निघाला .

shoe stand
Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

पाळत ठेवून असलेल्या चोराने अलगद चपलेच्या स्टँडमधून चावी घेतली. कुलूप उघडलं आणि १५ मिनिटांच्या आत साडेतीन तोळे सोन्यावर डल्ला मारला. संध्याकाळी शिंदे यांची पत्नी घरी आली आणि रोजच्या प्रमाणे कामाला लागली. त्यावेळी कपाटातील अंगठीची डब्बी उघडी पडलेली दिसली. त्यावेळी बाकी कपाट बघितलं तर घरातील सोनं गायब झाल्याचं कळालं.

घरात सगळ्यांना विचारलं मात्र कोणीही सकाळपासून कपाट उघडलं नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी CCTV चेक केला आणि एका मुलाने हा प्रकार केल्याचं समोर आल्यावर पोलिसांत धाव घेतली. हा प्रकार समोर आल्यावर आम्ही CCTV चेक केले आहेत. त्यावरून गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

shoe stand
Pune Crime: 'फोनवर कोणाशी बोलतोस?', असं विचारल्याने चिडलेल्या प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चावी हरवल्यास चावी न बदलता कुलूप बदलायला हवे, असं आवाहन पोलिसांनी केलंय.आम्ही खूप कष्टातून सोन कमावलं होतं ते आम्हाला शोधून द्यावे अशी भावना तक्रारदारांनी व्यक्त केली. सदर प्रकरणात आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.