शिक्रापूर (पुणे) : गावातील सर्व मागासवर्गीय कुटुंबे व सर्व अपंगांना मोफत आर. ओ. पाणी, ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल, प्रत्येकी दहा टक्के पगारवाढ, भिंतीवरील घड्याळे, अशा सगळ्याच दणदणीत भेटी तसेच, देण्याला प्रारंभ करीत केंदूर (ता. शिरूर) येथील सरपंच वंदना ताठे यांनी आपल्या सरपंचपदाच्या कारभाराचा निरोप घेतला.
दोन वर्षांपूर्वी केंदूर ग्रामपंचायतीचे सरपंचपदी विराजमान झालेल्या वंदना ताठे, उपसरपंच अॅड. दत्ताजी थिटे व सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी गेल्या पाच वर्षात भरीव कामे केली. यात ८० लाखांची दुष्काळी पाणी योजना, भोसुरेस्थळ, पऱ्हाडमळा आणि कान्हुराज मंदिर हे तीस लाखांचे तीन रस्ते, वाड्या-वस्त्यांवर १४ लाखांचे रस्ते आदी भरीव काम केले. हाच भरीव कार्यकाल पूर्ण करताना ग्रामपंचायत कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता. यात एकुण सर्व १५ कर्मचाऱ्यांना एक मोबाईल, प्रत्येकाला एक भिंतीवरचे घड्याळ, दहा टक्के भरीव पगारवाढ देत सरपंच वंदना ताठे यांनी सर्वांचा निरोप घेतला. दरम्यान रविवारी (ता. २३) ग्रामपंचयतीचा कारभार नियुक्त प्रशासकाकरवी केला जाणार असल्याने गावाने, सर्व कर्मचाऱ्यांनी, ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे-जे सहकार्य केले, त्याबद्दलही ताठे यांनी सर्वांचे आभार मानले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, गावातील एकुण ४० मागासवर्गीय कुटुंबांसाठी तसेच, ५० अपंगांसाठी वर्षभर मोफत पिण्याच्या पाण्याचे एटीएम कार्ड वाटण्यात आली. मागासवर्गीय कुटुंबांना तीन दहा हजार लिटच्या पाणीटाक्याही दिल्या. कार्यक्रमाला अभिजित साकोरे, गोविंद साकोरे, भाऊसाहेब पऱ्हाड, अंकुश पऱ्हाड, शिवाजी भोसुरे, गोरक्ष थिटे, विद्या थिटे, संगीता गावडे, जयश्री सुक्रे, मनिषा थिटे आदींसह ग्रामविकास अधिकारी एस. बी. दरेकर, कर्मचारी शिवाजी जाधव, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश साकोरे, पी. डी. थिटे, अर्जून धोत्रे, विलास गिरीगोसावी, प्रतिमा भोसुरे, आशा पवार, मंगल पवार, कान्हुबाई माने, संतोष साकोरे, शिवाजी साकोरे, आशिष थिटे, बाळासाहेब गाडेकर आदींचे सत्कार करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपसभापती सविता पऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
कोरोनाचे केवळ तीन रुग्ण
केंदूरमध्ये मार्च ते ऑगस्ट, अशा सहा महिन्यात केवळ तीन कोरोना रुग्ण सापडल्याचा विशेष उल्लेख ताठे यांनी केला. या गावच्या यशाचे श्रेयही त्यांनी संपूर्ण केंदूर ग्रामस्थ, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ यांना दिले.
Edited by Shivnandan Baviskar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.