केशवराव जेधेंनी आयुष्यात कधीही तत्त्वांशी आणि त्यांच्या भूमिकेशी तडजोड केली नाही

दिवंगत केशवराव जेधे यांनी आयुष्यभर सर्वसामान्य व्यक्ती, उपेक्षित, दलित आणि शेतकरी वर्गाचा विचार केला. या उपेक्षितांना न्याय देण्याचे विचार त्यांच्या अंतःकरणात खोलवर रुजले गेले होते.
केशवराव जेधेंनी आयुष्यात कधीही तत्त्वांशी आणि त्यांच्या भूमिकेशी तडजोड केली नाही
Updated on

पुणे - दिवंगत केशवराव जेधे यांनी आयुष्यभर सर्वसामान्य व्यक्ती, उपेक्षित, दलित आणि शेतकरी वर्गाचा विचार केला. या उपेक्षितांना न्याय देण्याचे विचार त्यांच्या अंतःकरणात खोलवर रुजले गेले होते. त्यामुळे त्यांनी आयुष्यात कधीही तत्त्वांशी आणि त्यांच्या भूमिकेशी तडजोड केली नाही. जेधे यांच्या चरित्र ग्रंथामुळे देशातील १९२० ते १९५४ या कालखंडातील समाजकारण, राजकारण याचा लेखाजोखा पुस्तक रूपात समोर आला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (ता.९) पुण्यात बोलताना केले.

केशवराव जेधे यांच्या कार्यातून अनेकांना जणांना प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्य लढ्यात झालेल्या शिक्षेतून माफी मिळण्यासाठी काही जणांनी माफी मागितली. काही जणांनी ब्रिटिशांना काय लिहून द्यायचे ते लिहून दिले. मात्र, जेधे यांनी त्यांची भूमिका बदलली नाही. त्यांनी जी भूमिका घेतली, त्या भूमिकेची जबाबदारी स्वीकारली व त्याची शिक्षा भोगण्यास मी तयार आहे, अशी खंबीर बाजू मांडली. त्यामुळेच त्यांना १८ महिन्यांची शिक्षा झाली, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्यावतीने आयोजित डॉ.य.दि.फडके लिखित 'केशवराव जेधे चरित्र' पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, सर्जेराव जेधे, फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, सचिव अनिल पवार, राजलक्ष्मी जेधे आदी उपस्थित होते.

केशवराव जेधेंनी आयुष्यात कधीही तत्त्वांशी आणि त्यांच्या भूमिकेशी तडजोड केली नाही
...आणि आमच्या मातोश्री पुणे लोकल बोर्डावर निवडुन आल्या

पवार म्हणाले, ‘राज्यात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होऊन गेली. परंतु सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणांऱ्यापैकी केशवराव जेधे एक होते. जेधे हे शेतकरी कुटुंबातील असूनही ते भांडी तयार करण्याच्या व्यवसायत ते उतरले. त्यानंतर सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी वाटचाल करून सर्वसामान्य लोकांशी ते जोडले गेले. सत्यशोधक चळवळीस त्यांनी प्रोत्साहित केले आणि सर्वधर्म समभाव जागवत त्यांनी समाजात जागृती केली. काँग्रेस चळवळीत सहभागी होऊन त्यांनी विविध निवडणूक जिंकल्या. मुलींच्या शिक्षणास प्राधान्य, बोरडाली सत्याग्रहा पाठिंबा, शेतकरी प्रश्नांची मांडणी, दलितांचे समस्यांवर आवाज उठवणे अशा विविध प्रश्नांवर त्यांनी काकासाहेब गाडगीळ यांच्यासोबत लढा दिला. जेधे-गाडगीळ कालखंड राज्यातील एक महत्त्वपूर्ण कालखंड होता. देशात काँग्रेस विचाराला शक्ती देण्यासाठी त्यांनी काँग्रेस विस्तारित करण्याचे काम काँग्रेस अध्यक्षपद काळात केले. १९५२ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. समाजातील सर्वसामान्य माणसाचे हित जपण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले.’’

‘जेधेंमुळे शारदाबाई पवार लोकल बोर्डवर’

पुणे जिल्हा लोकल बोर्डवर त्याकाळी ५० सदस्य निवडून द्यावे लागत असत. यापैकी कॉंग्रेसचे ३६ जण जेधे यांच्यामुळे लोकल बोर्डवर निवडून आले होते. या ३६ जणांमध्ये केवळ एक महिला होती. ती महिला म्हणजे माझी आई शारदाबाई पवार होत्या. आई शारदाबाईंना केशवराव जेधे यांच्यामुळेच लोकल बोर्डवर निवडून जाण्याची संधी मिळाली होती, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

संविधानाला अपेक्षित भारत निर्माण झाला का? - डॉ. बाबा आढाव

केशवराव जेधे यांचा मूळ स्वभाव चळवळीचा होता आणि त्यांचा वारसा जतन झाला पाहिजे. आज देशात गोंधळाची परिस्थिती आहे. भारतीय राज्य घटनेवर सही करणाऱ्यांपैकी एक जेधे होते. पण आता संविधानाला अपेक्षित भारत निर्माण झाला आहे का? हा प्रश्न आहे. महात्मा गांधी यांनी देश जोडला. परंतु गांधी यांच्यानंतर तशा प्रकारचा नेता कोणी झाला नाही. महात्मा जोतिराव फुले १८९० साली गेले आणि त्यांचे चरित्र १९२७ साली प्रकाशित झाले. मात्र फुले यांच्या जीवनावरील चित्रपट अद्याप निर्माण होऊ शकला नाही. ज्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचे, ते शिवाजी- संभाजी महाराज यांच्या इतिहासापर्यंतच थांबतात. त्यानंतर ज्या घटना घडल्या, त्याबाबत बोलले पाहिजे. सामाजिक चळवळीच्या इतिहासाची नीट प्रकारे मांडणी झाली पाहिजे. सत्यशोधक दलित, ब्राह्मणेतर चळवळीची कागदपत्रे गोळा करण्यात आली असून त्याची मांडणी व्यवस्थित व्हावी. आज 'आम्ही सारे भारतीय' सांगण्याची वेळ आहे. बहुजन तरुणांनी नवीन काळा प्रमाणे स्वतःत बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी डॉ. आढाव यांनी उपस्थित श्रोत्यांसह सत्यशोधक प्रार्थनेचे गायन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()