खडकवासला धरणातील पाणी होतंय नितळ

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात पाण्यासह मोठ्याप्रमाणात माती वाहून आल्याने गेल्या ३० वर्षात प्रथमच प्रचंड गढूळ पाणी आले होते.
Khadakwasala Dam
Khadakwasala DamSakal
Updated on

पुणे - शहराला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) पाण्यासह मोठ्याप्रमाणात माती वाहून आल्याने गेल्या ३० वर्षात प्रथमच प्रचंड गढूळ पाणी (Muddy Water) आले होते. त्यामुळे धरणात, मुठा नदीतून तांबडे पाणी (Red Water) वाहत होते. मात्र, आता धरणातील पाणी स्थिर झाल्याने गढूळता कमी होत असून, महापालिकेच्या प्रयोगशाळेत गढळूता २०० नेफोलोमॅट्रीक टर्बिडीटी युनीटवरून (एनटीयू) ५० एनटीयूपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जुलै महिन्यात खडकवासला धरण प्रकल्पात मुसळधार पाऊस झाला, तोडलेली झाडे, फोडलेले डोंगर यामुळे मोठ्याप्रमाणात मातीची धूप झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या ओढ्यानाल्यांना पूर आल्यानंतर त्यासोबत डोंगरातील तांबडी माती वाहून धरणामध्ये आली. दरवर्षी पावसाळ्यात धरणातील पाणी गढूळ होते, पण त्याचे प्रमाण एवढे जास्त नसते, यावेळी हे प्रमाण जास्त असल्याचे ग्रामस्थांनी सुद्धा सांगितले होते. खडकवासला धरणातून महापालिकेच्या जलकेंद्रावर पाणी शुद्धीकरण केले जात असताना त्याचसोबत प्रयोगशाळेत पाण्याची दर्जा कसा आहे याची तपासणी केली जाते.

Khadakwasala Dam
INS शिवाजीच्या 'MAAC'च्या ३२ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा संपन्न

धरणात पाणी जमा होताना महापालिकेने प्रयोगशाळेत तपासणी केली असता पाण्याची गढूळता २०० एनटीयू पर्यंत गेलेली होती. गेल्या तीन दशकात तरी एवढे गढूळ पाणी धरणातून कधीही आलेले नव्हते असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दरम्यान, पावसाळ्यात सुरवातीला गढूळ पाणी येते, पण त्याचे प्रमाण हे जास्तीत जास्त १०० ते १५० एनटीयू पर्यंत होते. २०१५-१६ मधील दुष्काळात धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला होता, तेव्हा शहरात गढूळ पाणी येत होते, पण तेव्हाही १५० एनटीयूच्या पुढे प्रमाण गेले नव्हते. यंदा मात्र सर्वात जास्त गढूळ पाण्याची नोंद झाली होती.

गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे, खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव ही चारीही धरणे जवळपास भरली आहेत. त्यांच्या पाणलोट क्षेत्रात गवत वाढल्याने आता माती वाहून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच धरणातील पाणी स्थिर होत असून वाहून आलेली माती तळात जात असल्याने पाणी स्वच्छ होत आहे. महापालिकेला आलेल्या पाण्याची तपासणी केली असता आता गढूळता ५० एनटीयू पर्यंत खाली आली आहे. पाण्याची गढूळता कमी करण्यासाठी गेले काही दिवस महापालिकेला मोठा खर्च येत होता, औषधांचा वापरही जास्त होत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Khadakwasala Dam
'कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका'; फडणवीस माध्यमांवर भडकले

दरम्यान, किरकटवाडी, खडकवासला, नांदेड, नांदोशी यासह गावांमध्ये धरणातील पाणी थेट कॅनॉलमधून उपसा केले जाते व नागरिकांना दिले जाते. हे या पाण्याचे शुद्धीकरण केले जात नाही,  

त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांना गेले जवळपास महिनाभर प्रचंड गढूळ पाणी येत होते. पण आता गढूळता कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.