Dr. Neelam Gorhe : पाण्याचा विसर्ग करताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले का? याच्या चौकशीची मागणी होईल

'खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करताना, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले की नाही, ज्यांनी याबाबतची माहिती लोकांपर्यंत संवेदनशीलपणे पोचवली नाही. त्यांची चौकशी करण्याची गरज आहे.
 Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam GorheSakal
Updated on

पुणे - 'खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करताना, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले की नाही, ज्यांनी याबाबतची माहिती लोकांपर्यंत संवेदनशीलपणे पोचवली नाही. त्यांची चौकशी करण्याची गरज आहे. त्यानुसार चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाईल.' असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी सांगितले.

डॉ.गोऱ्हे यांनी सोमवारी महापालिकेस भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 'खडकवासला धरणसाखळीतील पाणी सोडत असताना, हे पाणी दिवसा का सोडू शकत नाही ? परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा, म्हणजे रात्री दोन वाजता विसर्ग करणे, हे योग्य नाही.

रात्रीच्यावेळी इतका मोठा विसर्ग करण्याची गरज होती का? यासंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लक्ष घातले आहे. त्यांनी संबंधित परिस्थितीची कारणमीमांसा जाणून घेतली आहे. लोकांना माईकवरून सतर्क करणारी व्यवस्था खरच किती कार्यरत आहे, याबाबतही प्रशासनाशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या आहेत.'

शहराच्या प्रलंबित विकास आराखड्याबाबत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 'शहराचा विकास आराखडा तयार होतो, मात्र तो अनेक वर्ष प्रलंबित राहतो. आता विकास आराखड्यासंदर्भातील विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहेत. त्यामुळे आगामी सहा महिन्यात विकास आराखडे मंजूर होतील. उपसभापती असल्याने कामास मर्यादा येतात. मात्र महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांकडे मांडला जाईल.'

आमचे पूर्वाश्रमीचे नेते प्रचंड अभ्यासू

नदी सुधार प्रकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर 'आमच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांनी त्यामध्ये प्रचंड अभ्यास केला आहे. त्यावेळी आमचे काहीही मत असले, तरीही आम्ही तेव्हा काहीच बोलू शकत नव्हतो.' अशा शब्दात डॉ.गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. नदीसुधारबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन खुली चर्चा करावी, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.