Khadakwasala News : ‘ती’ ला वाचविण्यासाठी, सर्वांनी केली धावपळ

घरातील किरकोळ वादातून रागावून ‘ती’ सिंहगडावर आली. तिच्या मोबाईलच्या संभाषणानुसार ती आत्महत्या करणार असे वाटले. अन ती दरीच्या दिशेने गेली.
Girl
GirlSakal
Updated on

खडकवासला - घरातील किरकोळ वादातून रागावून ‘ती’ सिंहगडावर आली. तिच्या मोबाईलच्या संभाषणानुसार ती आत्महत्या करणार असे वाटले. अन ती दरीच्या दिशेने गेली. तिची दक्षता घेत पोलिसांना बोलावून घेतले. हवेली पोलिस, गडावरील वन विभाग, वन संरक्षण समितीचे सुरक्षारक्षक, पहारेकरी, नागरिकांनी तिची समजूत काढून तिला पायथ्याला आणले. संध्याकाळी तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.

सिंहगडावर बुधवारी दुपारी युवती एकटी आली होती. गडावर आल्यावर ती मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत होती. बोलताना वारंवार रडत रडत होती. ‘जिवाचे बरे वाईट करून घेईल. असे म्हणून बोलत होती.’ यावेळी गडावरील वन संरक्षण समितीचे सुरक्षारक्षक, पुरातत्व विभागाचे पहारेकरी यांना मुलीचे मनात काही तरी वेगळे, चुकीचे पाऊल उचलण्याचा उद्देश जाणवला.

तिच्याकडून काही तरी अघटीत घडण्याची शंका होती. दोनदा विचारपूस केली, ‘ताई, तुम्ही का रडताय.’ असे विचारले, तीने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. ती तरुणी काहीच न बोलता कल्याण दरवाज्याच्या दिशेने निघून गेली.

स्वप्निल सांबरे, राहुल जोरकर, दत्ता जोरकर, श्रीकांत लांघी, दिपक जोरकर हे खबरदारी म्हणून तिच्या मागोमाग गेले होते. त्यांनी ताबडतोब वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील, ग्रामस्थ तानाजी भोसले, घेरा सिंहगडचे पोलिस पाटील निलेश चव्हाण, खानापुरचे पोलिस पाटील गणेश सपकाळ माहिती दिली. पोलिस पाटीलांनी ही माहिती हवेली पोलिसांना दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, सुभाष गिरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल निलम निकम, संजय चोरगे, संदिप सोळसकर, वनपाल समाधान पाटील, वनकर्मचारी संदीप कोळी, समितीचे सुरक्षा रक्षकांसह, पोलिस पाटील, नागरिक तातडीने गडावर पोहचले. त्यांनी युवतीची समजून काढली अन तिला पायथ्याला घेऊन आले.

‘सर्वांच्या जागरूकतेमुळे आज एका मुलीचा जीव वाचविता आला. याचे सर्वांना समाधान वाटले.’

‘गडावरून तीला पोलिस ठाण्यात आणले. तिच्याशी संवाद साधून तिच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांना बोलवून तिला त्यांच्या ताब्यात दिले.’ अशि माहिती हवेलीचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.