खडकवासला - ‘नवीन रेशनकार्ड काढायचा फॉर्म द्या.’ असे नागरिक विचारत होते. साहेब म्हणाले, ‘हा क्यूआर कोड स्कन करा, त्यानंतर माहिती डाऊनलोड होईल. त्यानुसार, फॉर्म भरा. रेशनकार्ड फॉर्म आता ऑनलाईन भरायचा आहे.’, ‘मग त्यासाठी कोणती कागदपत्रे पाहिजेत नागरिक विचारत होते.’ आणखी माहिती विचारल्यावर कर्मचारी म्हणत होते. ‘सेवा केंद्रात जावा.’ हा संवाद होता. खडकवासला कोंढवे-धावडे येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातील…
रेशनकार्ड विभ्गाच्या तक्रारी तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे गेल्या. सुरवसे यांच्या सुचनेनंतर, रेशन कार्ड संबंधी लागणारी कागदपत्रे, माहिती नागरिकांना दिली. अनेकांच्या मोबाईलवरून फॉर्म भरले गेले. याबाबत अन्न प्रशासन अधिकारी गजानन देशमुख म्हणाले, ‘रेशनकार्ड फॉर्म ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया नुकतीच सुरु झाली आहे. कर्मचार्यांना माहितीदेण्याचे काम सुरु आहे.’
'शासन आपल्या दारी' अभियानाचे उदघाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते झाले. एक हजार ३६० नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा लाभ घेतला. तालुका पातळीवरील विविध १५ विभाग सहभाग झाले होते. महावितरणच्या संबधी अनेकजण विविध कामे घेऊन आले होते. पण त्यांचे अधिकारी कोण आले नव्हते. तसेच पावसाळा आला असताना कृषी विभागाने अद्याप बियाणे, कृषी साहित्य नसल्याने आमदार तापकीर यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, तालुका कृषी अधिकारी एम.डी.साळे, आरोग्य अधिकारी डॉ.सचिन सूर्यवंशी, सचिन वि.दांगट, सचिन मोरे, सरपंच सचिन पायगुडे, नितीन वाघ, ममता दांगट, किरण बारटक्के, सुभाष नाणेकर, उमेश सरपाटील, सचिन द.दांगट, भगवान मोरे, बाजीराव पारगे, नवनाथ तागुंदे, निखिल धावडे, अतुल धावडे यावेळी उपस्थित होते. अभियानचे नियोजन मंडल अधिकारी सूर्यकांत पाटील, प्रमोद भांड, व्यंकटेश चिरमुना, तलाठी सपना लोहकरे, प्रगती मोरे यांनी केले होते.
आमदार तापकीर म्हणाले, ‘कार्यालयात गेल्यावर एका दिवसात कामे पूर्ण होत नाही. या अभियानातून प्रत्येक विभागाचे प्रमुख येथे असतात. त्यामुळे, नागरिकांची एका दिवसात कामे पूर्ण होतात. या अभियानातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे.’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरु झाले आहे. प्रत्येक मंडल पातळीवर होणार आहे. हे अभियान राबविण्यात आमदार भीमराव तापकीर व त्यांच्या कार्यकर्त्यांचे योगदान मिळाले. असे प्रांताधिकारी संजय आसवले यांनी सांगितले. सूत्रसंचालन रमेश धावडे यांनी केले.
विभाग आणि लाभार्थी संख्या
रेशन कार्ड-२७०,
आरोग्य विभाग (पंचायत समिती)- २५८,
राज्य परिवहन महामंडळ एसटी- २५०,
विविध शासकीय दाखले- १९५,
आधार कार्ड- ११५,
एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प- ७१,
महापालिकेच्या (समाजकल्याण)- ४८
कृषी विभाग (महाराष्ट्र शासन)- ३२,
आरोग्य विभाग(महापालिका)- २०,
संजय गांधी निराधार योजना- ३०,
ग्राम विकास व पंचायत समिती- २१,
भुमिअभिलेख- १२,
मतदार नोंदणी- ५,
एकूण- १३६०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.