खडकवासला : खडकवासला वाहनांमध्ये ५० हजारापेक्षा अधिक रक्कम सापडणे, १० हजारावरील मद्य, भेट वस्तु, अंमली पदार्थ, पोस्टर्स, इतर निवडणुक साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने उमेदवार, प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते सापडल्यास सर्व साहित्य जप्त करण्यात यावे. तसेच १० लाखापेक्षा जास्त रक्कम सापडल्यास आयकर विभागाला कळविले जावे.” असे खडकवासला निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सांगितले.