खडकवासला : हवेली तालुक्याच्या पश्चिम भागात मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेचे चार आणि पंचायत समितीचे आठ गट आणि गण होते. आता खेड-शिवापूर खानापूर असा गट झाला आहे.मागील पंचवार्षिक मध्ये धायरी- खडकवासला, नऱ्हे-आंबेगाव, शिवणे- कोंढवे धावडे व डोणजे मांगडेवाडी असे चार मतदार संघ होते. यातील धायरी- खडकवासला, नऱ्हे-आंबेगाव, हे दोन जिल्हा परिषद पूर्ण तर शिवणे- कोंढवे धावडे गटातील चार गावे डोणजे मांगडेवाडीतील कात्रज परिसरातील पाच सहा वाड्या- वस्त्यांचा पालिकेत समावेश झाला. यातील उर्वरित गावांचा एकच जिल्हा परिषदेचा गट तयार झाला आहे.
हवेली शहरालगत असलेल्या व लोकसंख्येने मोठी असलेल्या सुमारे पंधरा ते सोळा गावांचा पुणे महापालिकेत मागील पाच वर्षात समावेश झाला. परिणामी पूर्ण तीन जिल्हा परिषद सदस्य भाग हा महापालिकेत गेल्यामुळे आता फक्त एकच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण असा हा ग्रामीण भाग राहिलेला आहे. आज या गट आणि गणांची रचना जाहीर झाली आहे. ९३- खेडशिवापुर पंचायत समिती गण व ९४- खानापुर पंचायत समिती गण मिळून ४७ क्रमांकाचा खेड-शिवापूर खानापूर गट तयार झाला आहे.
९३-खेडशिवापुर पंचायत समिती गण समाविष्ट ग्रामपंचायत व वाड्या वस्त्या पुढील प्रमाणे
खेडशिवापुर, शिवापूर, श्रीरामनगर, गोगलवाडी, गाऊडदरा, आर्वी, आर्वीचे तानाजीनगर, कोंढणपुर, कोंढणपुरचे अवसरेनगर, राहटवडे, कल्याण, कल्याणची मोरदरी, डोणजे, गो-हे बुद्रुक
९४-खानापुर पंचायत समिती गण समाविष्ट ग्रामपंचायत व वाड्या वस्त्या पुढील प्रमाणे :
अहिरे, अहिरेची वांजळेवाडी, अहिरेची खाडेवाडी, अहिरेची मोकरवाडी, कुडजे, आगळंबे खड़कवाडी, बहुली, बहुलीची भगतवाडी, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, सांगरुण, जांभळी, आंबी, सोनापुर, खानापुर, गो-हे खुर्द, खांमगांव मावळ, खांमगांव मावळ मोगरवाडी, वरदाड़े, मालखेड, मणेरवाड़ी, घेरासिंहगड, घेरासिंहगडची थोपटेवाडी, घेरासिंहगडची सांबरेवाडी, घेरासिंहगडची मोरदरी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.