किरकटवाडी : खडकवासला धरण चौपाटीवर हवेली पोलीसांचा बंदोबस्त असताना आणि वनविभागाने मगरींपासून सावध राहण्याचा इशारा दिलेला असताना रविवारी अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून थेट पाण्यात उतरलेले दिसले. धक्कादायक म्हणजे यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.
खडकवासला धरण परिसरात पर्यटकांना बंदी आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याकडून दर शनिवार व रविवारी खडकवासला धरण चौपाटीवर नाकाबंदी करण्यात येते. या रविवारी चौपाटीवर बंदोबस्त तैनात असताना बंदोबस्ताच्या ठिकाणाच्या दुसऱ्या बाजूला पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली दिसत होती.
काही दिवसांपूर्वीच खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खानापूर येथे मगरीचे पिल्लू आढळले होते. त्यानंतर वनविभागाच्या वतीने अनेक ठिकाणी 'मगरींपासून सावध राहा' असे फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच खडकवासला धरण क्षेत्रात अनेक मोठ्या मगरी असण्याची शक्यता वनकर्मचारी व वन्यजीव प्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांनी धरणाच्या पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते.
"सिंहगड किल्ल्याकडे मोठ्या प्रमाणात वाहने जात असल्याने गोळेवाडी चौक येथे जादा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खडकवासला धरण चौपाटीवरही काही पोलीस कर्मचारी तैनात केले होते. पर्यटक दुसऱ्या बाजूला पोलीसांची नजर चुकवून पाण्यात उतरतात. अतिउत्साहीपणा पर्यटकांच्या जीवावर बेतू शकतो."
-सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक हवेली पोलीस ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.