Pune News : सुरक्षा रक्षक खुर्चीवर बसून अन् त्यांच्या समोर पर्यटकांचे खडकवासला धरणात उतरुन फोटोसेशन

संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची कार्यकारी अभियंत्यांची माहिती
khadakwasla dam tourist photoshoot in water security guard action pune
khadakwasla dam tourist photoshoot in water security guard action puneSakal
Updated on

किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरण्यास बंदी घातलेली असताना व या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात असताना पर्यटक बिनधास्तपणे धरणात उतरुन फोटोसेशन करताना दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे खुर्चीवर बसून असलेले सुरक्षारक्षक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

याबाबत संबंधितांवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी दिली आहे. हजारो पर्यटक जीव धोक्यात घालून खडकवासला धरणात उतरुन फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी स्टंट करत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

तसेच धरणात उतरणारे पर्यटक पाण्यात मोठ्या प्रमाणात कचरा करत असल्याने प्रदूषणही होत होते. सकाळ'ने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर मे महिन्यात पाटबंधारे , सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, पुणे मनपा व पोलीस अशा सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन खडकवासला धरण परिसरात पाहणी केली.

khadakwasla dam tourist photoshoot in water security guard action pune
Mumbai News : मेट्रो स्थानक रद्द नको स्थलांतरित करा स्थानिकांची मागणी; मुख्यमंत्र्याच्या निर्णयाकडे लक्ष

त्यानंतर पर्यटकांना धरणात उतरण्यास प्रतिबंध करण्यासाठी पाटबंधारे विभागाने दहा सुरक्षारक्षक तैनात केले. पाण्यात उतरण्यासाठी असलेल्या वाटा बंद करण्यात आल्या. जोपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली होती तोपर्यंत पर्यटक पाण्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत नव्हते मात्र मागील काही दिवसांपासून धरणातील पाण्याची पातळी खालावली असल्याने पुन्हा पर्यटक धरणात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत.

khadakwasla dam tourist photoshoot in water security guard action pune
Washim News : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात!

पर्यटकांना रोखण्यासाठी तैनात असलेले सुरक्षारक्षकच काही पर्यटकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन त्यांना धरणात उतरुन फोटो, व्हिडिओ काढण्याची मुभा देत आहेत. सुरक्षारक्षकांच्या या कृतीमुळे पाटबंधारे विभागाने लावलेले 'धरणात उतरल्यास पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल' असे फलक केवळ दिखावा म्हणून उभे करण्यात आल्याची प्रचीती येत आहे. "उपविभागीय अभियंत्यांना याबाबत योग्य कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत." - श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.