Kharif crop : राज्यात खरीप पेरा ९४ टक्क्यांवर;सोयाबीन, कपाशी, तूर, मका पेरा पूर्ण; १३४ लाख हेक्टरवर पेरण्या

राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भात वगळता सर्व पिकांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. येत्या पंधरवड्यात उर्वरित दहा लाख हेक्टरवरील भाताची पुनर्लागवडदेखील पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Kharif crop
Kharif cropsakal
Updated on

पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे भात वगळता सर्व पिकांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. येत्या पंधरवड्यात उर्वरित दहा लाख हेक्टरवरील भाताची पुनर्लागवडदेखील पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्याच्या सरासरी १४२ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापैकी २५ जुलैअखेर १३४ लाख हेक्टरवरील (९४ टक्के) पेरा पूर्ण झाला आहे. पुणे विभागात आतापर्यंत १२८ टक्के झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात ९७ टक्के, लातूर ९८ टक्के, अमरावती ९६ टक्के, नाशिक ९२ टक्के; तर कोल्हापूर विभागात ९४ टक्के खरीप पेरा आटोपला आहे. पेरण्यांमध्ये केवळ कोकण (६७ टक्के) व नागपूर (७२ टक्के) विभाग किंचित मागे आहेत. तेथील भात पुनर्लागवडीची कामे अद्याप चालू आहेत. दमदार पावसामुळे पुनर्लागणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात एक जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान सरासरी १०७५ मिलिमीटर पाऊस होतो. त्यापैकी २०८ मिलिमीटर जूनमध्ये; तर जुलैत ३३१ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा मॉन्सूनची वाटचाल दमदार सुरू आहे.

त्यामुळे वर्षभराच्या सरासरीपैकी ६१९ मिलिमीटर म्हणजेच ५२ टक्के पाऊस गेल्या ५२ दिवसांमध्ये झालेला आहे. यंदा जूनमध्ये २२१ मिलिमीटर (१०७ टक्के), तर जुलैत ३९८ मिलिमीटर (१२० टक्के) पाऊस पडला. राज्यात यंदा कुठेही पेरण्या रखडल्या नाहीत. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या महसूल मंडलांची संख्या आताच ३१५ च्या वर गेली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास ३१३ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चांगल्या पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत राज्यात खरिपाचा एकूण पेरा ११२ टक्के म्हणजेच १३४ लाख हेक्टरपर्यंत गेला आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मका ही राज्याची मुख्य खरीप पिके आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.