Sakal Khau Galli 2023 : खाद्यपदार्थांचा आस्वाद अन्‌ मनमुराद धमाल

‘सकाळ’ आयोजित या खाऊगल्लीचे सहावे पर्व शुक्रवारपासून सुरू होत आहे.
Sakal Khau Galli 2023 start from 5th may at karvenagar mahalaxmi lawns pune
Sakal Khau Galli 2023 start from 5th may at karvenagar mahalaxmi lawns punesakal
Updated on

पुणे - तुम्हाला पुण्यातच कोकणातील वेगळ्या धाटणीचे मालवणी जेवण, सोलापूरची चटणी, शेगावची कचोरी, नाशिकची मिसळ अशा एकाहून अधिक खाद्यपदार्थांचा आस्वाद ‘सकाळ खाऊगल्ली २०२३’मध्ये घेता येणार आहे. होय, ‘सकाळ’ आयोजित ‘सकाळ खाऊगल्ली’ शुक्रवारपासून (ता. ५) कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये तुमच्या भेटीला येत आहे.

‘सकाळ’ आयोजित या खाऊगल्लीचे सहावे पर्व शुक्रवारपासून सुरू होत आहे. याचे मुख्य प्रायोजक कोहिनूर बासमती राइस असून पॉवर्ड बाय सवाई मसाले आणि सहयोगी प्रायोजक क्रेझी चिझी, काका हलवाई स्वीट्स सेंटर आणि बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ हे आहेत. तर बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे फायनान्स पार्टनर आहेत.

महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांसोबतच दाक्षिणात्य, पंजाबी पदार्थांची खास मेजवानी खाद्यप्रेमींसाठी येथे उपलब्ध असणार आहे. चवदार, लज्जतदार पदार्थांबरोबरच मनाला तृप्त करणाऱ्या, गारेगार करणारे डेझर्ट, आइस्क्रीम्स, पेस्ट्रीज, मस्तानी, ज्यूस हे सर्व काही पुणेकरांना ‘सकाळ खाऊगल्ली’च्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

Sakal Khau Galli 2023 start from 5th may at karvenagar mahalaxmi lawns pune
Pune : येवलेवाडीत अनाधिकृत प्लॉटिंगसह बांधकामांवर कारवाई

वैशिष्ट्ये काय?

खादाडीसोबत अनुभवता येणार धमाल मजा, मस्ती

कार्यक्रमस्थळी आयपीएल मॅचेस्‌चे स्क्रिनिंग

लहान ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी भरपूर मनोरंजन

प्रवेश शुल्क : फक्त ३० रुपये (प्रतिव्यक्ती)

तीन वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेश

सफर ‘जादुई दुनिये’ची

सादरकर्ते : जादूगार प्रसाद कुलकर्णी

सादरीकरण : मॅजिक ट्रिक्स, मेंटल मॅजिक

वेळ : सायंकाळी ७ ते रात्री ८ (तिन्ही दिवस)

असे होईल सादरीकरण : मेंटल मॅजिक (ता. ५),

मॅजिक ट्रिक्स (ता. ६), ऑप्टिकल मॅजिक इल्लूशन (ता. ७)

Sakal Khau Galli 2023 start from 5th may at karvenagar mahalaxmi lawns pune
Sharad Pawar Retirement नंतर Jayant Patil यांना NCP तून बाजूला केलं जातंय का?

गायक जितेंद्र भुरूक यांचे गायन

वेळ : रात्री ८ ते १० वाजेपर्यंत (तिन्ही दिवस)

असे होईल सादरीकरण : बॉलिवूड हिट्‌स- नवीन गाणी

(ता. ५), रोमॅंटिक गाण्यांचा ‘प्यार का मौसम’ (ता. ६),

किशोर कुमार हिट्‌स (ता. ७)

मुलांसाठी ‘किड्स झोन’

वेळ : सायंकाळी ६ वाजल्यानंतर (तिन्ही दिवस)

‘किड्स झोन’मध्ये असणारे खेळ : बुल राइड, व्हीआर गेम, टॉय

ट्रेन, एअर हॉकी, वॉल क्लॅबिंग, बाऊन्सी, ट्रॅम्पोलिन, बलून

शूटिंग, बॉक्सिंग पंच, रिंग टॉस, फेस टॅटू आणि बरेच काही.

Sakal Khau Galli 2023 start from 5th may at karvenagar mahalaxmi lawns pune
Sakal Survey: पवारांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला फटका? ६० टक्के लोक म्हणतात…

असे असतील कार्यक्रम

सफल लाइव्ह बॅण्ड

वेळ : सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत (तिन्ही दिवस)

असे होईल सादरीकरण : पंजाबी आणि मराठी

गाणी (ता. ५), बॉलिवूड गाणी (ता. ६) आणि

सुफी गाणी (ता. ७)

अशी असेल वेळ

तारीख - वेळ

शुक्रवार, ५ मे - सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत

शनिवार, ६ मे - सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत

रविवार, ७ मे - सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.