Khed Alandi Vidhnsabha : खेड-आळंदी विधानसभेची जागा ठाकरे गटाला मिळणार का? पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी

खेड तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटले.
Sanjay Raut
Sanjay Rautsakal
Updated on

चाकण - खेड तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटले. खेड-आळंदी विधानसभेची जागा ही महाविकास आघाडीत ठाकरे गटालाच मिळावी अशी आग्रही मागणी पक्षाकडे केली.यावेळी खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला मिळावी यासाठी आग्रही आहोत.ठाकरे गटालाच खेड ची जागा मिळेल असे खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

खेड तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी,जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख व इतरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुंबई येथे भेट घेतली. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाल्यास उमेदवाराला अनुकूल राहील असे चर्चेत सांगितले.

खेड तालुक्यातील पक्ष संघटना, शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी खेड -आळंदी विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही आहेत. ही जागा शिवसेनेला मिळाल्यास उमेदवार विजयी होऊ शकतो असेही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगितले. निवडणूक लढविण्यासाठी पदाधिकारी तयार असल्याचे सांगितले.

येत्या विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.खेड तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी. असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मत आहे यासाठी वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने लढवावी ही निवडणूक मशाल या चिन्हावर लढविण्यात यावी असा पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. ठाकरे गटातील कोणालाही उमेदवारी मिळाली तर इतर इच्छुक त्या उमेदवाराचे काम करतील व शिवसेनेचा उमेदवार खेड तालुक्यात विजयी होईल असे सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड,तालुका प्रमुख रामदास धनवटे, अमोल पवार,बाबाजी काळे शिवाजी वर्पे , रामहरी आवटे,सुदाम बोत्रे, राहुल मलघे आदी उपस्थित होते.

खेड तालुक्यातील ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी केलेली असली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने ही जागा आम्हाला मिळावी आम्ही लढणार आहोत. अशाही चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडेही इच्छुक उमेदवार बरेच आहेत तेही निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे बालेकिल्ल्यातील ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाला मिळणार अशा ही चर्चा रंगत आहे. त्यामुळे नक्की जागा कोणाला मिळणार हे विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.