Crime News : पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेले बाळ तब्बल १२ दिवसांनी सापडले

पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बाळाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे.
Baby Found
Baby FoundSakal
Updated on
Summary

पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बाळाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे.

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या बाळाचा शोध घेण्यात लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे. अपहरण झाल्यानंतर १२ दिवसांनी पोलिसांना बाळाचा शोध लागला. त्याचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भूपेश भुवन पटेल (वय दोन वर्ष ११ महिने) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. विजय अनंत जयस्वाल आणि सुमन शर्मा अशी अपहरणकर्त्यांची नावे आहे. त्यांनी १० डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनमधील सरकरत्या जिन्याजवळून मुलाचे अपहरण केले होते. पोलिसांनी रांजणगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

याबाबत लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात उदरनिर्वाहासाठी आलेले एक दांपत्य त्यांच्या मूळगावी झारखंड येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. या दाम्पत्याबरोबर त्यांचा अडीच वर्षाचा चिमुरडाही बरोबर होता. प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील सरकत्या जिन्यालगत रात्री साडे-आठ वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्ते त्यांच्या जवळ आले. त्यांच्याशी गप्पा मारू लागले. महिलेने तिच्याजवळील खाऊ मुलाला खाण्यास दिला.

या दरम्यान मुलाबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, असे दाखवून ते दोघे त्या बाळाला आणखी खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले. मात्र परत न आल्याने मुलाच्या आर्इ-वडिलांनी या बाबत रेल्वे पोलिसांत तक्रार केली. लोहमार्गचे पोलिस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक गणेश शिंदे, पोलिस उपअधिक्षक (मुख्यालय) चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्गचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सात पथकांनी घेतला शोध -

मुलाच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्गने सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या नेतृत्वात एकूण सात तपास पथके तयार केली होती करण्यात आली होती. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील चौकांचे व संपूर्ण परिसराचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी या पथकांनी केली. त्याचप्रमाणे शहरातील ७८ लॉज, हॉटेल्स यांच्या ठिकाणी छापे मारण्यात आले. तसेच ११० विक्रेत्यांकडील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे छायाचित्रण तपासण्यात आले. तपासात पोलिसांनी माहिती मिळाली की, बालकाचे एका महिलेने तिच्या साथीदारासह अपहरण केले आहे. त्यासाठी त्यांनी रिक्षाचा वापर केला आहे. या माहितीनुसार अपहरणकर्तेच्या तांत्रिक हालचाली व सोशल मीडियावरील हालचालींचा वेध घेऊन मुलाचा शोध घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.