Kishor Aware: सहा महिन्यापासून होता आवारेंच्या जिवाला धोका; NCPच्या आमदारावर कुटुंबियांचे मोठे आरोप

किशोर आवारे हत्येप्रकरणी
Kishor Aware
Kishor AwareESAKAL
Updated on

पिंपरी, ता. १३: तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (वय ४८, ता. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांची शुक्रवारी (ता. १२) दुपारी पावनेदोनच्या सुमारास गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करून हत्त्या करण्यात आली. या प्रकरणी आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर व त्याचे तीन साथीदार यांच्या विरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आवारे यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे यांनी फिर्याद दिली आहे.

Kishor Aware
Karnataka Election Result : सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछाडी; बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर

किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे (६९, स्वप्न नगरी, तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि. पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, किशोर आवारे यांचे राजकीय विरोधक असलेले सुनिल शेळके, सुधाकर शेळके,संदीप गराडे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच खटका खटकी होत असे.

गेल्या सहा महिन्यापासून किशोर हे नेहमी मला आमदार सुनिल शेळके त्याचा भाऊ सुधाकर शेळके यांच्याकडून जिवाला धोका असल्याबाबत सांगत असत. तसेच माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल हे प्रत्यक्षपणे सांगितले असे.

Kishor Aware
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; केलं इमर्जन्सी लँडिंग

किशोर यांनी स्वतःचा वेगळा गट तयार करून सुनिल शेळके यांना गेल्या दोन वर्षापासून पुर्णपणे राजकीय विरोध केलेला आहे. तसेच सोशल मिडीयावरही ही बाब टाकली होती. त्याचा राग शेळके याच्या मनात होता. तसेच, किशोर आवारे यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होवून सुनिल शेळके व सुधाकर शेळके यांच्या राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता.

शुक्रवारी (ता.१२) किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत गेले असता दुपारी पावनेदोन वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेच्या खाली गेटच्या आत आवारामध्ये किशोर आवारे याच्यावर सुनिल शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचे साथीदार श्याम निगडकर व इतर तीन अनोळखी हल्लेखोरांनी आपआपसात संगनमत करुन बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने गंभीर वार करून जखमी करुन किशोर यांचा खून केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()