कोचीला पुण्यातील पर्यटकांची पहिली पसंती

पुण्यातील पर्यटक हे आपल्या केरळ पर्यटनवारीमध्ये ‘कोची’ शहराला भेट देण्यास प्रथम पसंती देतात.
Kochi Keral
Kochi KeralSakal
Updated on
Summary

पुण्यातील पर्यटक हे आपल्या केरळ पर्यटनवारीमध्ये ‘कोची’ शहराला भेट देण्यास प्रथम पसंती देतात.

पुणे - पुण्यातील पर्यटक हे आपल्या केरळ पर्यटनवारीमध्ये ‘कोची’ शहराला भेट देण्यास प्रथम पसंती देतात. त्यानंतर केरळमधील दक्षिण काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुन्नार’ या हिल स्टेशनचा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर पेरियार राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध ‘थेक्कडी’ हिल स्टेशन तर, हाऊसबोट्ससाठी प्रसिद्ध ‘अलप्पुझा’ पर्यटनस्थळाला पुणेकरांनी चौथ्या क्रमांकांची पसंती दिली आहे, अशी माहिती केरळ पर्यटन विभागाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पर्यटन मंत्री पीए महम्मद रियास म्हणाले, ‘‘नुकताच संपलेला सणासुदीचा काळ केरळच्या पर्यटनासाठी सकारात्मक होता. कोरोनानंतरच्‍या काळात पर्यटनाला वाढता प्रतिसाद दिसून आला. आम्ही केरळमध्ये हिवाळ्यातील सुटीच्या मोसमाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहोत. ज्‍याचा टाइम मासिकाच्या ‘५० एक्‍स्‍ट्राऑर्डनरी डेस्टिनेशन्‍स ऑफ द वर्ल्‍ड टू एक्‍स्‍प्‍लोर इन २०२२’ मध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे. हाऊसबोट्स, कॅराव्हॅन स्टे, जंगल लॉज, वृक्षारोपण भेटी, होमस्टे, आयुर्वेद-आधारित वेलनेस सोल्यूशन्स आणि साहसी उपक्रमांसह टेकड्यांवर ट्रेकिंग यामधून पर्यटनातील वेगळेपण दिसून येत आहे.’’

पर्यटन प्रधान सचिव के. एस. श्रीनिवास म्हणाले, ‘‘कोरोनानंतर केरळचा पर्यटन उद्योग पूर्वस्थितीत आला आहे. यावर्षी देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात गतवर्षीच्‍या तुलनेत १९६ टक्क्यांनी वाढ केली आहे. या सप्टेंबरअखेर देशांतर्गत १ कोटी ३३ लाख ८० हजार पर्यटकांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी कोरोनापूर्वीच्या तुलनेत १.४९ टक्क्यांनी अधिक आहे.’’ आम्ही केरळचे नवीन प्रकल्प तसेच समुद्रकिनारे, हिल स्टेशन्स, हाऊसबोट्स आणि बॅकवॉटर सेगमेंट यावर भर देत विस्तृत योजना आखल्या आहेत, असे पर्यटन संचालक पी. बी. नूह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.