कोल्हापूरच्या डॉ. अभिनंदन पाटील यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

औषधनिर्माणशास्रात सलग तीन वेळा सुवर्ण पदक प्राप्त करत कोल्हापूरच्या डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील या युवकाने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान पटकाविले आहे.
Dr Abhinandan Patil
Dr Abhinandan PatilSakal
Updated on
Summary

औषधनिर्माणशास्रात सलग तीन वेळा सुवर्ण पदक प्राप्त करत कोल्हापूरच्या डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील या युवकाने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान पटकाविले आहे.

पुणे - औषधनिर्माणशास्रात (Pharmacology) सलग तीन वेळा सुवर्ण पदक (Gold Medal) प्राप्त करत कोल्हापूरच्या डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील (Dr Abhinandan Patil) या युवकाने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (International Book of Records) स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांना महाराष्ट्राचा स्टार्टअप हिरो या पुरस्काराने (Award) गौरविण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या संजय घोडावत विद्यापीठात औषधनिर्माणशास्रात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. पाटील सध्या कर्करोगावर संशोधन करत आहे. शिवाजी विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत आणि त्यानंतर डी.वाय. पाटील विद्यापीठातून पीएच.डी.तही सुवर्ण पदक पटकावीत त्यांनी हा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड बरोबर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही डॉ. पाटील यांची नोंद झाली आहे. औषधनिर्माण शास्त्राच्या आवडीबद्दल डॉ. पाटील म्हणतात, ‘‘माझ्या ओळखीच्या लोकांमध्येच कर्करोग आणि पार्किंन्सनचे भयाण वास्तव मी बघितले. या दुर्धर आजारांना अजूनही औषध नसल्याचे पाहून, या क्षेत्रात काही भरीव करायचे हे मी ठरविले. माझे कुटुंबीय आणि शिक्षक या प्रवासात माझे प्रेरणास्थान ठरले.’’

Dr Abhinandan Patil
पुणे महापालिकेच्या वसाहतींना सहाव्या वेतन आयोगानुसार भाडे

डॉ. पाटील यांचे संशोधन

- शोधनिबंध - २९

- भारतीय पेटंट - १०

- परदेशी पेटंट - ८

- सुवर्ण पदके - ३

कर्करोग झाल्यावर उपचार केले जातात. पण कर्करोग होऊ नये म्हणून आवश्यक प्रतिबंधात्मक औषधे आणि पोषकतत्वांवर आम्ही संशोधन करत आहे. केवळ औषधनिर्माणशास्त्र नव्हे तर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून औषधांनी निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. अभिनंदन पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.