पुणे - पुण्याहून सुटणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची शनिवारी (ता. १४) चाचणी घेण्यात आली. ताशी १८० किमी वेगाने धावण्याची क्षमता असणाऱ्या वंदे भारतसाठी ११० किलोमीटरचा वेग निर्धारित केला आहे. या रेल्वेचे एक्सलरेशन अत्यंत चांगले आहे.
अवघ्या ४० सेकंदांत ११० किमीच्या वेगाने धावू शकते. इतका वेग असला, तरी याचा रायडिंग इंडेक्स हा २. ५ इतका आहे. हा देशात धावणाऱ्या रेल्वेपैकी सर्वांत चांगला निर्देशांक समजला जातो. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे.