सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने वा-यावर सोडलेल्या तळेगाव-चाकण मार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका चालूच आहे.
तळेगाव स्टेशन - सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने वा-यावर सोडलेल्या तळेगाव-चाकण मार्गावर (Talegaon-Chakan Road) जीवघेण्या अपघातांची (Accident) मालिका चालूच आहे. गुरुवारी (ता. २१) सकाळी देहुफाट्याजवळ चाकणकडे चाललेल्या गॅस टँकर (Gas Tanker) कॅप्सुलने पाठीमागून धडक (Dash) देऊन चिरडल्याने दुचाकीस्वार (Bike) जागीच ठार (Death) झाला. डोके आणि अंगावरून चाके गेल्यामुळे डोक्यात हेल्मेट घातलेले असूनही दुचाकीस्वार इसमाच्या मेंदूचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला.
जितेंद्र रजनीकांत मगदूम (३०, सध्या राहणार वराळे, मावळ / मुळगाव शिरोळ, ता. इचलकरंजी, कोल्हापूर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर टॅन्करचालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला. तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी टॅन्करचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.