महापालिकेच्या विरोधात कोंढवा ग्रामस्थांचे आंदोलन; विविध खोदकामांच्या विरोधात संताप

कोंढव्यातील दशरथ मरळ चौकात काहीकाळ रास्ता रोको करण्यात आला.
Kondhwa residents protest against  Municipal Corporation over various excavations work marathi news
Kondhwa residents protest against Municipal Corporation over various excavations work marathi news
Updated on

कोंढवा, ता. ९ : महापालिकेच्या विरोधात कोंढवा ग्रामस्थांनी रविवारी (ता. ९) आंदोलन केले. विविध ठिकाणी विकासकामांच्या नावाखाली खोदकाम करत नागरिकांना वेठीस धरल्याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यासंबंधात कोंढव्यातील दशरथ मरळ चौकात काहीकाळ रास्ता रोको करण्यात आला.

कोंढवा बुद्रुक भागातील पोलिस ठाणे, शूरवीर येसाजी कामठे चौक, दशरथ मरळ चौक, पुण्यधाम आश्रम रस्ता, खडीमशीन चौक, श्रीकुंज सोसायटी, काकडेवस्ती तसेच येवलेवाडी येथील प्रमुख रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने खोदकाम करण्यात आले आहे. त्या खोदकामाच्या विरोधात भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालींदर कामठे आणि माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. कामठे म्हणाले, 'सदरचे खोदकाम हे गेली कित्येक दिवस सुरु आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. सध्या पाऊस सुरु झाला असल्यामुळे त्या खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तसेच रत्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन अपघात होत आहेत.

Kondhwa residents protest against  Municipal Corporation over various excavations work marathi news
PM Oath ceremony : पुण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन! मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी? PMO मधून फोन...

पिण्याच्या पाण्याची वाहिनी आणि वीजेच्या वाहिन्या या भूमिगत आहेत. काम करतेवेळी त्याची तुटाफुट होऊन नागरिकांना प्राथमिक गोष्टीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कात्रज कोंढवा रस्त्याचे काम रखडले असून मोठ्या खड्ड्यात चार मुली पडून एका मुलीचा नाहक बळी गेला आहे, अशा वारंवार घटना घडत असल्याचे माजी आमदार महादेव बाबर यांनी म्हटले.

Kondhwa residents protest against  Municipal Corporation over various excavations work marathi news
Pune Rain: 'भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!', पुण्यातील पाणी साचण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल

कोंढवा आणि येवलेवाडी येथे सर्वच बाजूने खोदकाम सुरू असल्याने वाहतुकीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊन वाहतूककोंडी होत आहे. याचा त्रास ग्रामस्थांना होत असून हे काम लवकर लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्या विभागाकडून त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देत महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता सिद्राम पाटील यांना कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांच्या मध्यस्थीने निवदेन देण्यात आले. यावेळी कोंढवा पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी माजी नगरसेविका संगीता ठोसर, गणेश कामठे, भरत धर्मावत, गंगाधर बधे, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.