Konnichiwa Pune 2023 : पुणेकरांना घडणार जपानी संस्कृतीचं दर्शन; शनिवारपासून सुरू होतोय 'कोन्निचिवा पुणे' फेस्टिव्हल

Pune Japan Festival : या कार्यक्रमात कॉसप्ले कॉम्पिटिशन देखील असणार आहे.
Konnichiwa Pune 2023
Konnichiwa Pune 2023eSakal
Updated on

Indo-Japan Cultural Festival : जपानमधील संस्कृतीचं दर्शन घेण्याची, आणि ती अनुभवण्याची सुवर्णसंधी पुणेकरांना उद्यापासून मिळणार आहे. विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी 'कोन्निचिवा पुणे' फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 4 वाजेपासून हा महोत्सव सुरू होईल. यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. यामध्ये जपानहून आलेले कलाकार आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करतील. यासोबतच भारतीय कलाकार देखील आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

मुंबईमधील कॉन्स्युलेट जनरल ऑफ जपान आणि पुण्यातील इंडो-जपान बिझनेस काउन्सिल यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

जपानी संस्कृतीचे दर्शन

या महोत्सवात जपानी पारंपारिक चहाचा कार्यक्रम, म्हणजेच 'साडो' काय असतं हे पाहता येणार आहे. सोबतच, जपानी सुलेखन पद्धती 'शोडो', कागदांपासून विविध गोष्टी बनवणारा कलाप्रकार - 'ओरिगामी', फुलांची रचना करण्याची पद्धत 'इकेबाना', काराओके, फ्युजन डान्स, किमोनो फॅशन शो, बोन ओडोरी हा नृत्यप्रकार अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

अ‍ॅनिमे फॅन्ससाठी पर्वणी

जपानी कार्टूनचा प्रकार, म्हणजेच अ‍ॅनिमेचे भारतात आणि महाराष्ट्रात देखील भरपूर चाहते आहेत. या अ‍ॅनिमे फॅन्ससाठी हा कार्यक्रम म्हणजे पर्वणी असणार आहे. याला कारण म्हणजे, या कार्यक्रमात कॉसप्ले कॉम्पिटिशन (Pune Cosplay Competition) देखील असणार आहे. यामध्ये कित्येक कलाकार तुम्हाला तुमच्या आवडत्या पात्रांच्या रुपात पहायला मिळतील. 25 नोव्हेंबरला ही कॉम्पिटिशन पार पडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.