Pune Viral Video: असं घडलं कोथरूडमध्ये हीट अँड रन! खासगी बसने दुचाकीस्वारासह वाहनांना उडवले; पहा व्हिडिओ

Kothrud Accident: या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
Kothrud Accident Viral Video
Kothrud Accident Viral VideoEsakal
Updated on

भरधाव खासगी बसने दुचाकीस्वार आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा व मॅक्स गाडीला धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना कोथरूड येथील वनाज कॉर्नर परिसरात बुधवारी घडली.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वनाज कॉर्नरजवळ आज सकाळी भरधाव बसचालकाने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा आणि मॅक्स गाडीला धडक दिली.

या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

खासगी बसचालक आरोपी बाळू बाळासाहेब थोरात (रा. चाफेकर चौक, चिंचवड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीड्यावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.