कोथरूड - ‘उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपले राज्य वाचवू शकले नाहीत आणि इकडे सांगायला आले आहेत. तिकडे त्यांचे ‘बटेंगे-कटेंगे’ चालले आहे. परंतु ते पुण्यात अजिबात चालणार नाही. येथील वातावरण चांगले असून, निकाल लागल्यावर तुम्हाला याची प्रचिती येईल,’ असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.