पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीतर्फे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज (ता. २४) त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होतेच, पण शहराच्या अन्य भागातील भाजपचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक देखील सहभागी होते.