पुणे : शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारी पर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात (Bus Fire Incidents) आगीच्या चार घटना घडल्या. त्यामध्ये चांदणी चौक येथे रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका बसला लागलेली (Fire on bus) आग विझविताना कोथरुड अग्निशामक दलाचे प्रमुख (Kothrud Fire brigade) अधिकारी भाजल्याने ते गंभीर जखमी (Chief authority injured) झाल्याची घटना घडली. संबंधित अधिकाऱ्यास उपचारांसाठी तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रविवारी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक येथे एका बसला अचानक आग लागली. काही वेळातच संपुर्ण बस आगीमध्ये सापडली. दरम्यान, याबाबत नियंत्रण कक्षाला खबर मिळताच, कोथरुड अग्निशामक केंद्राचे प्रमुख गजानन श्रीपाद पाथरुडकर (वय 54) यांच्या मार्गदर्शनाखालील जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुंबई-बंगळुरु बाह्यवळण महामार्गावर रस्त्याच्याकडेला जवानांकडून आग विझविण्याचे काम जवानांकडून सुरू होते.
त्याचवेळी पाथरुडकर हे देखील घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत होते. त्यावेळी बसच्या डिझेलच्या टाकीचा स्फोट झाल्याने डिझेल त्यांच्या चेहऱ्यावर व हातांवर उडाल्याने ते गंभीररीत्या भाजले. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ नजीकच्या दवाखान्यात नेते. तेथून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पाथरुडकर हे 25 ते 30 टक्के भाजले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, जवानांनी बसची आग आटोक्यात आणली.
रविवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील गजराज चौक येथील एका इमारतीला आग लागली होती. खबर मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. तर रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास धायरी येथील डीएसके रस्त्यावर असणाऱ्या चव्हाण बागेमधील एका गादीच्या कारखान्याला आग लागली. त्याबाबत माहिती मिळताच पुणे महानगरपालिका व पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या गाड्या, पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उंड्री-पिसोळी येथील आंबेकर हॉटेलजवळील एका गादीच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या व असंख्य जवान घटनेस्थळी रविवारी सकाळपर्यंत आग विझविण्याचे काम करीत होते. दरम्यान, या घटनेत गादीचे गोडाऊन जळून खाक झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.