Pune Crime : कोथरूडमध्ये गुंड टोळक्याने तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करून केला खून

गुंड टोळक्याने तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री घडली.
Murder
Murderesakal
Updated on

पुणे - गुंड टोळक्याने तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी गुन्हे शाखेने अल्पवयीन मुलासह पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर अन्य एकाला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले.

श्रीनु शंकर विसलावत (वय २२, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाने (वय १७, रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) फिर्याद दिली आहे. त्यावरून अलंकार पोलिस ठाण्यात सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण दत्ता कदम (वय २२), अजय ऊर्फ सचिन जाधव (वय १८), रोहन कल्याण अडागळे (वय १८, तिघे रा. वडारवस्ती, कर्वेनगर), अथर्व लक्ष्मण शेळके (वय २०, रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) या संशयितांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, श्रीहरी बहिरट यांच्या पथकाने ही कारवाई केली. तर, अलंकार पोलिसांनी प्रकाश अनंतकर (रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावरून १६ जून ते १७ जूनच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. फिर्यादी आणि श्रीनु हे दोघे रात्री डहाणूकर कॉलनीतील एका केकच्या दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडील दुचाकीने फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केला.

परंतु फिर्यादी तो वार चुकवून घराच्या दिशेने पळाला. त्यानंतर आरोपींनी श्रीनुचा पाठलाग करून त्याच्या मानेवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने श्रीनुचा मृत्यू झाला. पुढील तपास परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com