Pune Water Supply : पाण्याअभावी केळेवाडीत महिलांचे हाल; समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे पुरवठा विस्कळीत

कोथरूड येथील एआरआय रस्त्यावरील केळे वाडी, राऊतवाडी भागात तीन दिवस झाले पाणी आले नाही
kothrud water supply disturb water storage marathi news pune
kothrud water supply disturb water storage marathi news puneSakal
Updated on

कोथरूड : टाकी उषाला आणि कोरड घशाला अशी गत झाली आहे. आम्हाला घरकामं बी करायची आणि पाणी बी भरायची कामं करावी लागतात. पाण्यापायी कामाचा खाडा झाला. मालकीण पण विश्वास ठेवणा. करायचे तरी काय? राऊत वाडी येथील भारती कासरूंग सांगत होत्या.

कोथरूड येथील एआरआय रस्त्यावरील केळे वाडी, राऊतवाडी भागात तीन दिवस झाले पाणी आले नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री पासून पाणी आणण्यासाठी पाण्याच्या टाकीवर महिलांची रांग लागली. समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे केळे वाडी परिसरातील पुरवठा विस्कळीत झाला. वाहिनीत एअर ब्लॉक आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कामगारांनी सांगितले.

सुलोचना राजेंद्र पाटील म्हणाल्या की, बुधवारी रात्री पासून पाणी नाही. बायांनी कामाला कधी जायचे? एवढ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी परिस्थिती झाली आहे. सुलाबाई शिंदे, वय ७०, या आजी म्हणाल्या की, मुलाला पक्षघात झाला आहे. त्याला पाणी आणता येणे शक्य नाही . मंग काय करणार. नाईलाज आहे. पाणी नसल्याने आले पायपीट करत.

दिवा प्रतिष्ठानचे हर्षवर्धन मानकर म्हणाले की, फोनवर अधिका-यांशी संपर्क साधला की, अर्धा तासात पाणी येईल असे सांगायचे. पण तांत्रिक दोष शोधता न आल्यामुळे पाणी आले नाही. मनपाने पर्यायी व्यवस्था म्हणून पाण्याचे टॅंकर देखील पाठवले नाही.

कनिष्ठ अभियंता प्रतिक थोरात म्हणाले की,

समांतर पाणी पुरवठा योजनेचे काम चालू होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाणी येणे अपेक्षित होते. परंतु तांत्रिक अडचणी आल्याचे संबंधितांनी सांगितले . टॅंकरची गरज लागेल असे वाटले नाही. वस्ती भाग असल्याने रात्री उशिरा गल्लीबोळात टॅंकर पाठवणे शक्य नव्हते.

दिलीप कानडे यांनी सांगितले की, पुर्वी जल वाहिनी खालील बाजूस होती. नव्या कामामुळे वाहिनी उंचावर आली. पाण्याच्या टाकीतील पातळी कमी झाली तर काही ठिकाणी पाणी पोहचणे अवघड होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.