Koyata Attack Accused Video: 'एपीआय'वर कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलिसी खाक्या, व्हिडिओमध्ये पहा अटकेनंतर कशी झाली आरोपींची अवस्था

Koyata Attack Accused Pune Police: आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पुणे पोलीस या आरोपींचे पाय बांधून त्यांना पोलीस स्टोशनमध्ये आणत असल्याचे दिसत आहे.
Koyata Attack Accused Video
Koyata Attack Accused VideoEsakal
Updated on

Pune Police Attacker Caught by Police Viral Video: दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका टोळीने  सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक केली होती.

निहालसिंग मन्नूसिंग टाक (19) आणि राहुलसिंग रवींद्रसिंग भोंड (20, दोघेही रा. हडपसर येथील कॅनॉल रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पुणे पोलीस या आरोपींचे पाय बांधून त्यांना पोलीस स्टोशनमध्ये आणत असल्याचे दिसत आहे.

पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर जिल्ह्यात लपलेल्या दोन्ही आरोपींना एपीआय रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

दरम्यान, आरोपींना पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात आणले असता, पोलिसांनी त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना ठाण्यात नेले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी पोलीस स्टेशनमध्ये जाताना उड्या मारत जाताना दिसत आहेत.

Koyata Attack Accused Video
Pune Woman Murder: पुण्यात खुनाचा भयंकर प्रकार; तरुणीचे डोके, हात, पाय कापून धड नदीपात्रात फेकले

दरम्यान अलिकडील काळात पुण्यात कोयता गँगने हैदोस घातला आहे. दिवसा ढवळ्या पुण्यात कोयत्याने हल्ले होत आहेत. आतापर्यंत हे हल्ले सामान्यांवर होत होते. पण आता या गुन्हेकारांची मजल पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

यापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र काही दिवसांत पुन्हा एकदा कोयता गँग एक्टीव झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Koyata Attack Accused Video
Samudrayaan : ‘समुद्रयाना’ची डुबकी, ‘गगनयाना’ची झेप एकाच दिवशी; समुद्रतळाप्रमाणेच अवकाशाचाही घेणार वेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.