Koyta Gang: पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय! सीसीटीव्ही मधील व्हिडिओ व्हायरल, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय! स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
Koyta Gang
Koyta GangEsakal
Updated on

पुण्यातील येरवडा भागामध्ये कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. या भागात हातात कोयते घेऊन एका तरुणाचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हा.रल झाला आहे. तर पोलिसांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवल्या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. पुन्हा एकदा कोयता गँगला नियंत्रणात आणण्यासाठीचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. (Latest Marathi News)

ही घटना रविवारी घडली आहे. हातात कोयते घेऊन या लोकांनी परिसरात दहशत माजवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या घटना कमी झाल्या होत्या. पुन्हा एकदा ही घटना समोर आल्यानंतर परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयता गँगला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.(Marathi Tajya Batmya)

Koyta Gang
Nilwande Dam: 'मी निधी मागतो फडणवीस तिजोरी खोलून पैसे देतात', एकनाथ शिंदेंच मोठं वक्तव्य

तरुणांची टोळी किरकोळ वादातून थेट परिसरात शस्त्र घेऊन फिरत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहेत. पुण्यातील गांधीनगर येरवडा परिसरामध्ये काही टोळक्याने कोयता व धारधार शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवले होते. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने पाठलाग करत कोयता व काठ्या घेऊन परिसरात दहशत पसरवल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली होती.(Latest Marathi News)

Koyta Gang
Sharad Pawar: पवारांची भाकरी सोलापूरात करपली? भालकेंची नाराजी राष्ट्रवादीला पडणार महागात?

या प्रकरणी पाच आरोपींना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेले काही दिवस येरवडा परिसरामध्ये कोयता व इतर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे व परिसरामध्ये आपलं वर्चस्व ठेवण्याकरिता काही टोळी आपले डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आम्हाला गुन्हेगारांपासून संरक्षण द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सातत्याने येरवडा भागात वाहनांची तोडफोड असेल किंवा कोयता घेऊन दहशत मजवण्याचे प्रकार अनेक वेळा घडत आहेत. (Latest Marathi News)

Koyta Gang
Nashik Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या OBC सतर्कतेबद्दल BJPच्या प्रमाणपत्राची नाही गरज : छगन भुजबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.