Astronomy Projects: खगोलीय महाप्रकल्पांसाठी पुण्यात प्रयोगशाळा;२०२५पर्यंत आयुका २.० होणार कार्यान्वित,संशोधन प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना

Laboratory in Pune for Astronomical Projects: खगोलशास्त्रीय संशोधनासाठी जगभरात आता महाकाय प्रयोग हाती घेतले जात आहेत. भारतातही गुरूत्वीय लहरींच्या वेधशाळेबरोबरच (लायगो इंडिया) अवकाशीय दुर्बिणींची निर्मिती केली जात आहे.
Astronomy Projects
Astronomy Projectssakal
Updated on

पुणे : खगोलशास्त्रीय संशोधनासाठी जगभरात आता महाकाय प्रयोग हाती घेतले जात आहेत. भारतातही गुरूत्वीय लहरींच्या वेधशाळेबरोबरच (लायगो इंडिया) अवकाशीय दुर्बिणींची निर्मिती केली जात आहे.

अशा महाकाय प्रकल्पांची बीज संकल्पना, तांत्रिक प्रयोग, कुशल मनुष्यबळ निर्मिती आणि वैज्ञानिक संशोधनासाठी आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) एक उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावत आहे. आयुकाच्या विस्तारित इमारतीमुळे (आयुका २.०) पुणे आता महाकाय खगोलशास्त्रीय प्रकल्पांची प्रयोगशाळा म्हणून ओळखले जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात १९८८ मध्ये स्थापन झालेली आयुका संस्था आता जवळपास दुपटीने विस्तारत आहे. ‘अॅकॅडेमिक अँड रिसर्च बिल्डिंग-आयुका २’ चे बांधकाम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. नव्या आयुकामध्ये ‘लायगो’, तसेच अॅस्ट्रोसॅटवर संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या, अभ्यागतांसाठी जागा, सभागृह, कॉन्फरन्स रूम अशा सर्वसुविधा निर्माण केल्या जात आहे. ३० कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च असलेल्या आयुका २.० चे बांधकाम २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

अत्याधुनिक प्रयोगशाळा

जमिनीखाली लायगो प्रकल्पासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभी राहत आहे. उपकरणाला कोणत्याही प्रकारची कंपने नकोत म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. खगोलीय निरीक्षणासाठी ऑप्टीक्सचा वापर होतो. म्हणून ऑप्टिक्स लॅब, क्लीन रूम, रेडिओ भौतिकशास्त्र प्रयोगशाळा राहणार आहे. अॅस्ट्रोसॅट उपग्रहाचा डेटा आयुकात येतो. या डेटाचा अभ्यास करून, त्यावर संशोधन करण्यासाठी सर्व नव्या सोयी-सुविधांनी युक्त अत्याधुनिक लॅबची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती संचालक डॉ. आर. श्रीआनंद यांनी दिली.

संशोधक वाढले...

आयुकामधील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ४० टक्क्यांनी वाढली आहे. विद्यार्थ्यांची संख्या तर दुप्पट झाली असून वर्गखोल्यांसह प्राध्यापकांसाठी नवीन इमारतीत प्रयोगशाळा, वर्गखोल्या असणार आहेत. ‘आयुका २’च्या निर्मितीमुळे पुढील २५ ते ३० वर्षे संशोधनाला लागणाऱ्या सोयी-सुविधांची पूर्तता होणार आहे.

Astronomy Projects
Jio च्या रिचार्जला BSNL ची टक्कर; १६० दिवसांच्या प्लानमध्ये तुमच्या पैशांचीही होईल बचत

प्रशिक्षण

महाकाय प्रकल्पांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञांची निर्मिती आयुकाच्या माध्यमातून होणार आहे. संशोधन प्रकल्पांच्या दृष्टीने ‘एमएस्सी’च्या विद्यार्थ्यांना येथे प्रयोग करता येणार आहे. पुढे एक वर्षाचा संशोधक प्रशिक्षण कार्यक्रम असेल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष प्रयोगात काम करणाऱ्या संशोधकांना प्रशिक्षण दिले जाईल.

आयुका २.०ची वैशिष्ट्ये

  • महाकाय प्रकल्पांच्या प्रयोगशाळांची निर्मिती

  • २०० आसनक्षमतेच्या सभागृहाची निर्मिती

  • अत्याधुनिक पद्धतीने विज्ञान पार्क पुन्हा बांधला जाणार

  • संशोधक अभ्यागतांसाठी विशेष व्यवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.