घोरपडी : वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये सोयीसुविधांचा अभाव

राज्य शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून सिनेमा गृह व नाट्यगृह सुरू होत
घोरपडी : वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये सोयीसुविधांचा अभाव
घोरपडी : वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये सोयीसुविधांचा अभावsakal
Updated on

घोरपडी : राज्य शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून सिनेमा गृह व नाट्यगृह सुरू होत आहेत. परंतु वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्याने नाट्यप्रेमी नाराज आहेत. प्रशासन मात्र प्रलंबित समस्यांच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत असल्याने सांस्कृतिक भवन हे समस्यांच्या विळख्यात अडकले आहे.

नाट्यगृहात असलेली साऊंड सिस्टीम खराब झाल्याने आवाज व्यवस्थित येत नाही. सांस्कृतिक भवन मध्ये पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध नसल्याने पिण्यासाठी पाणी बाहेरुन आणावे लागत आहे. पावसाचे पाणी जमा करण्याची रेन हार्वेस्टिंगची सुविधा दुर्लक्षित झाली असून त्याठिकाणी झुडपे, गवत वाढले आहे. पाण्याच्या टाक्या अनेक महिन्यापासून साफ करण्यात आलेल्या नाहीत. तसेच चेंबरची साफसफाई झाली नसल्याने चेंबर तुडुंब वाहत आहेत.

सांस्कृतिक भवनच्या संरक्षक भिंतीवर जाळीचे कुंपनाबाबतचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी भिंतीवरुन उड्या मारुन मद्यपीं दारु पिण्यासाठी वास्तूच्या आवारात बसतात. मद्यपींना हटकल्यास ते रखवालदाराला दमदाटी करत मारण्याची धमकी देत असून व शिवीगाळ करतात. मागील बाजूस असलेला प्रवेशद्वार अनेक वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून वास्तूचा हा भाग वापराविना पडून व दुर्लक्षित झाला आहे. सीटसीटीव्हीवर नियंत्रण ठेवणारा टिव्ही हा व्यवस्थापक खोलीत नसल्याने घडणाऱ्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होत नसल्याने सीटसीटीव्ही असून उपयोग नाही, अशी येथे परिस्थिती निर्माण झाली आहे.

घोरपडी : वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन मध्ये सोयीसुविधांचा अभाव
सिंधुदुर्ग : चाळीस वर्षानंतरही शेतकरी पाण्यापासून वंचित

"सर्व समस्यांबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मुख्य खात्याकडून विविध कामांसाठी टेंडर लावले असून लवकरच सर्व सुविधा उपलब्ध होतील. तोपर्यंत क्षेत्रिय कार्यालयकडून साफसफाई व इतर कामांसाठी पत्रव्यवहार केला आहे परंतु त्यांच्याकडून सुविधा मदत नसल्याने बाहेरून बिगारी आणून काम करावे लागत आहे."

-राजेश शिंगाडे, व्यवस्थापक , महात्मा फुले सांस्कृतिक भवन

सांस्कृतिक भवन मधील समस्यांचा पाढा

  • सांस्कृतिक भवनाच्या निआँनसाईन बोर्ड मधील लाईट कित्येक महिन्यांपासून बंद आहे.

  • बहुउद्देशीय हॉल या शब्दामधील 'हॉल' हा शब्द तुटला.

  • वास्तुवर लावण्यात आलेल्या काचा, मार्बल काही ठिकाणी फुटल्या आहेत.

  • भवनमधील अनेक दरवाजांना हँडल नाहीत.

  • कँन्टीन असलेल्या परिसराची दुरावस्था झाली आहे.

  • स्वच्छतागृहाला असणाऱ्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत.

  • साफसफाई नसल्याने सर्वत्र धुळ व जाळ्या झाल्या आहेत.

  • भिंतींवरील रंग निघाल्याने भिंतींची दुरावस्था झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()